belgaum

सचिन अहिर यांचे बेळगाव शिवसेनेच्या वतीने स्वागत

0
31
Sachin ahir
 belgaum

बेळगाव लाईव्ह :माजी मंत्री सचिन अहिर व उपनेते अरुण दुधवाडकर यांचे बेळगावात शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी मंत्री तथा आमदार सचिन अहिर व अरुण दुधवाडकर यांचे रविवारी दुपारी सांबरा विमानतळावर जल्लोषी स्वागत करण्यात आले.

बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. ‘बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, शिवसेना झिंदाबाद’ अश्या घोषणा देत १ नोव्हेबर काळ्या दिनाला उपस्थित राहण्याचे विनंती केली.

 belgaum

Sachin ahir
दोन दिवसावर आलेल्या १ नोव्हेंबर काळ्या दिनाला निषेध व्यक्त करण्यासाठी बेळगाव च्या काळ्याफेरीत सहभाग रहावे अशी विनती बेळगाव जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आली पण, सचिन अहिर म्हणाले, सध्या ही धावती भेट असली तरी पुढील काळात बेळगावला स्वतंत्र भेटू देऊ, व सिमाप्रश्न सविस्तर चर्चा करू असे आश्वासन त्यांनी दिले.

सचिन अहिर व अरुण दुधवाडकर हे आजरा येथे आपल्या खासगी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून बेळगाव विमानतळावर दाखल झाले होते. बेळगाव तालुका प्रमुख सचिन गोरले यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत उपशहर प्रमुख राजू तुडयेकर ,प्रवीण तेजम,प्रकाश राऊत,पिराजी शिंदे,दतात्रय पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.