बेळगाव लाईव्ह:बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणामुळेच राज्यातील काँग्रेस सरकारचे पतन होऊ शकते असा गौफ्यस्फोट माजी मंत्री गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी केला आहे. सोमवारी सकाळी बेळगावातील शासकीय विश्रामधामात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केपीसीसी डी के शिवकुमार यांच्यावर निशाणा साधला.
सध्या बेळगाव जिल्ह्यात डी के शिवकुमार यांचा हस्तक्षेप वाढल्याचा आरोप पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी मागील आठवड्यात केला होता त्यानंतर राज्यात बेळगावचे राजकारण तापले आहे त्या पाश्वभुमीवर रमेश जारकीहोळी यांनी डी के शिव कुमार यांच्या वर जोरदार हल्ला चढवला आहे.
माझी एच डी कुमार स्वामी यांच्याशी जवळीक आहे त्यामुळे शिवकुमार यांना पोटशूळ आला आहे कोणत्याही सरकार मध्ये शिवकुमार असेल तर ते सरकार डेनझर झोन मध्ये असते असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
सत्तेत असताना एक प्रकारे तर सत्तेत नसताना एक प्रकारे ते वागत असतात त्यामुळे महाराष्ट्राच्या धर्तीवर राज्यातील सरकार एका रात्रीत कोसळू शकते असा दावा देखील त्यांनी केला त्यामुळे पुन्हा एकदा बेळगावात राजकीय संघर्ष पहायला मिळतो की काय याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
शिवकुमार तुरुंगात जातील का या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मी कालच जगदीश शेट्टर यांना भेटून आलोय असे सांगत शिवकुमार हे सी डी मास्टर आहेत तीच त्यांच्याकडे शक्ती आहे सी डी ठेऊनच ते राजकारण करतात लवकरच ते माजी मंत्री होतील शिवकुमार ही नाटकं कंपनी आहे असा देखील टोला त्यांनी हाणला.
भाजपचे नाव खराब करण्यात शिव कुमार या नाटक कंपनीचा पुढाकार आहे त्यांच्याकडे आमदार पदाची लॉटरी लागून निवडून आलेले आमदार आणि मंत्री आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.