Wednesday, May 22, 2024

/

पावसाने उघडे पाडले पितळ, बेळगाव ‘स्मार्ट’ नव्हे ‘डर्टी’ सिटी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :हिवाळ्याच्या सुरुवातीला आज सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह वळीव पावसाने बेळगाव शहराला झोडपून काढले. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या निकृष्ट कामाचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले.

जुने बेळगाव प्रवेशद्वाराच्या ठिकाणासह बहुतांश ठिकाणी गटारी तुंबून रस्ते केरकचरा -घाण मिश्रित पावसाच्या पाण्याखाली गेल्यामुळे तर बेळगाव ‘स्मार्ट’ नव्हे ‘डर्टी’ सिटी आहे यावर जणू शिक्कामोर्तब झाले.

बेळगाव शहर परिसराला आज सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास हिवाळ्यातील पहिल्या वडील पावसाने मुसळधार हजेरी लावली. पावसाच्या जोरदार हजेरीमुळे घराबाहेर पडलेल्या सर्वांची एकच तारांबळ उडाली होती.

 belgaum

पावसाचा जोर इतका होता की अल्पावधीत शहरातील ठिकठिकाणी गटारे तुंबून रस्ते घाण केरकचरा मिश्रित पावसाच्या पाण्याखाली गेले जुने बेळगाव प्रवेशद्वाराच्या ठिकाणी तर संपूर्ण रस्ता पाण्याखाली जाऊन त्याला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे मोठी गैरसोय निर्माण होऊन पादचाऱ्यांसह वाहनचालक वगैरे सर्वांना त्रासाला सामोरे जावे लागले. अर्धवट अवस्थेतील स्मार्ट सिटीच्या कामाच्या ठिकाणी तसेच रस्त्यावर खोदकाम केलेल्या ठिकाणी तर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते.

रस्त्यावर पसरलेली गटारातील केरकचरा घाण, अर्धवट अवस्थेतील विकास कामे, त्या ठिकाणची अस्वच्छता, चिखलाच्या दलदली या सर्व गोष्टी बेळगाव शहर ही ‘स्मार्ट सिटी’ नव्हे तर ‘डर्टी सिटी’ आहे हेच जणू दर्शवत होत्या.

वळीव पावसाच्या मुसळधार हजेरीमुळे नेहमी गजबजलेली असणारे शहराच्या बाजारपेठेतील रस्ते अचानक निर्मनुष्य झाले. या पद्धतीने सध्याच्या सणासुदीच्या काळात पावसामुळे ग्राहकांनी पाठ फिरवल्यामुळे दुकानदार आणि व्यापारीवर्गात पावसाबद्दल नाराजीचे सूर उमटत होते.Drainage water on road

दरम्यान, बेळगाव स्मार्ट सिटीच्या कामांमध्ये उणिवा असून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आल्याच्या आरोपांसह अधिकाऱ्यांची मनमानी आणि लोकप्रतिनिधींनी सोयीची भूमिका घेतल्यामुळे विकास कामांचा दर्जा घसरल्याची तक्रार काल शहरातील नागरिकांनी केंद्रीय पथकाकडे केली होती. कोट्यावधी रुपये खर्च करून बेळगाव शहरात राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेची केंद्रीय स्मार्ट सिटी योजना आणि वस्ती व्यवहार विभागाचे एडीजी राजीव जैन यांनी काल रविवारी पाहणी केली.

त्यावेळी उपस्थित नागरिकांनी बेळगाव स्मार्ट सिटी योजनेचा कशाप्रकारे बोजवारा उडाला आहे त्याची माहिती अधिकाऱ्यांना देताच पाहणीसाठी आलेले केंद्रीय अधिकारी अवाक् झाले होते. या पार्श्वभूमीवर आता आज मुसळधार वळीव पावसाने नागरिकांच्या मदतीला धावून येत स्मार्ट सिटी योजनेच्या निकृष्ट विकास कामांचे पितळ उघडे पाडल्याचे आणि बेळगाव ही स्मार्ट नव्हे तर डर्टी सिटी आहे हे सिद्ध केल्याचे बोलले जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.