बेळगाव लाईव्ह :राज्यसभेचे खासदार ईरान्ना कडाडी यांनी केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या कर्नाटकातील हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी बेळगावमध्ये डॉपलर वेदर रडार केंद्र उभारण्याची विनंती केली.
दिल्ली मुक्कामी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना निवेदन देत अशी मागणी केली आहे. राज्याचा आकार आणि विविधता लक्षात घेता आपले स्वतःचे डॉपलर वेदर रडार स्टेशन स्थापन करण्याची गरज आहे, कर्नाटकात एकही डॉपलर वेदर रडार स्टेशन नाही. त्यामुळे तज्ज्ञांच्या शिफारशींच्या आधारे बेळगाव, कुंदापूर, रायचूर आणि बंगळुरू ही चार मोक्याची ठिकाणे विचारात घेण्यासारखी आहेत, कारण बेळगाव हे तीन राज्यांच्या सीमावर्ती भागात असून बेळगाव हे सर्वात योग्य ठिकाण असल्याचे त्यांनी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जागतिक हवामान परिस्थितीमुळे बदलत्या हवामान पद्धतींमुळे हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणे अधिक महत्त्वाचे आहे. डॉप्लर रडार त्यांच्या 50-100 किमी त्रिज्येच्या प्रभावीतेसाठी ओळखले जाते ते विविध वेव्ह बँड वापरतात आणि अशा प्रकारे पावसाची तीव्रता, वाऱ्याची दिशा आणि वादळाची हालचाल यासारखे गंभीर हवामानविषयक मापदंड प्रदान करतात.
वेळेवर हवामानाची माहिती आपल्या शेतकर्यांसाठी केवळ शेती पद्धतींना अनुकूल बनवण्याच्याचसाठी नव्हे तर आपत्तीची तयारी आणि व्यवस्थापन करण्यासाठी या शिवाय रडार जीव वाचवण्यासाठी नुकसान कमी करण्याच्या मोठ्या संधी उघडते. यामुळे प्रतिकूल हवामानाच्या घटना जाणून घेणे सोयीचे होईल असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वावलंबी संकल्पनेनुसार भारतात डॉपलर रडारची निर्मिती करण्यात येत आहे त्यामुळे मंत्र्यांनी बेळगावची मागणी सकारात्मकतेने घेतली आहे.
रडार परदेशातून आयात न झाल्याने बनवण्यास विलंब होत आहे आगामी काळात बेळगावला प्राधान्याने घेऊन आपण आढावा घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याचे राज्यसभा खासदार ईरण्णा कडाडी यांनी सांगितले आहे.