बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्योत्सवानिमित बेळगाव शहरात अवजड वाहनांना बंदीचा आदेश बजावण्यात आला असून रहदारी मार्गात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.
राज्योत्सवानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीमुळे बुधवारी 1 नोव्हेंबर रोजी बेळगाव शहरातील रहदारी मार्गात बदल करण्यात आला आहे. सकाळी 8 पासून मिरवणूक संपेपर्यंत खालील मार्गावरील वाहने अन्यत्र वळविण्यात आली आहेत, असे पोलिस आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
जिल्हा क्रीडांगणापासून राज्योत्सव मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. कोल्हापूर सर्कल, डॉ. आंबेडकर रोड, चन्नम्मा चौक, काकती वेस, शनिवार खूट, गणपत गल्ली, कंबळी खूट, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी चौक, यंदे खूट, कॉलेज रोड या मार्गावरुन निघणार आहे. या काळात शहरातील रहदारी अन्य मार्गाने वळवली जाणार आहे.
चिकोडी, कोल्हापूर भागातून येणाऱ्या वाहनचालकांनी बॉक्साईट रोडमार्गे आत जाऊन ग्लोब थिएटरपासून बाहेर पडण्याचे आहे. सीबीटीकडून येणाऱ्या वाहनधारकांनी जिजामाता सर्कलपासून वळण घेऊन पाटील गल्लीमार्गे बीएसएनएलजवळून बाहेर पडण्याचे आहे. जिजामाता चौकातून नरगुंदकर भावे चौकाकडे येणारी वाहने पिंपळ कट्ट्याजवळून पाटील गल्लीमार्गे स्टेशन रोडला सोडली जातील. सीबीटीकडून आरटीओ सर्कलमार्गे गोव्याला जाणाऱ्या वाहनांना जुन्या पीबी रस्त्यावरून होसूर
पिंपळकट्टा, बसवेश्वर सर्कलपासून गोवावेसमार्गे सोडले जाणार आहे. खानापूर व गोव्याकडून येणाऱ्या वाहनांना ग्लोब थिएटरपासून पुढे कॅम्पमधून बॉक्साईट रोडला सोडले जाणार आहे. सीबीटीपासून अथणी, कोल्हापरहून शहरात येणाऱ्या बसेसना बेळगाव कॅन्सर हॉस्पिटलपासून कनकदास सर्कलमधून आत सोडले जाईल.
हिरेबागेवाडी भागातून येणाऱ्या बसेस गांधीनगरमधून फळ मार्केटपासून थेट सीबीटीला येतील. आरटीओ सर्कलपासून चन्नम्मा चौकाकडे जाणारी वाहने सीबीटीजवळील अशोक सर्कलपासून पुढे सोडली जातील. मिरवणूक मार्गावरील दुहेरी रस्त्याची एक बाजू मिरवणुकीसाठी तर दुसरी वाहनांसाठी असेल. या काळात शहरातून अवजड वाहने सोडली जाणार नाहीत, असे पत्रकात म्हटले आहे.
वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था…
• केएलई रुग्णालयासमोरील केईबीचे मैदान
• धर्मनाथ भवन सर्कलजवळील रिकामी जागा
• जुने भाजी मार्केट
कॅम्पमधील आसदखान दर्गाजवळील रिकामी जागा
• कॉलेज रोडवरील बेननस्मिथ कॉलेजचे मैदान
• मराठा विद्यानिकेतनचे मैदान, देशपांडे खूटजवळ