belgaum

बेळगाव लाईव्ह :काळ्या दिनाच्या पाश्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव जिल्हा प्रवेश बंदीचा आदेश बजावला आहे.

सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत दादा पाटील, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने या चार नेत्यांना बेळगावात 1 नोव्हेंबर रोजी काळ्या दिनाच्या सायकल फेरी अथवा जाहीर सभेत सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली आहे.

31 ऑक्टोबर सायंकाळी 6 पासून 2 नोव्हेंबर सायंकाळी 6 वाजे पर्यंत या चारही महाराष्ट्राच्या नेत्यांना बेळगावात बंदीचा आदेश बजावण्यात आला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितिच्या 1 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळ्यादिनी सहभागी होण्यासाठी तीन मंत्री आणि खासदार येण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश बजावला आहे. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून ते २ नोव्हेंबर सायंकाळ पर्यंत हा प्रवेश बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. एक नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समिती काळादिन
पाळून रॅली काढून नंतर मराठा मंदिर येथे सभा आयोजित करणार आहे. काळादिन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत दादा पाटील, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने येणार असल्याची
शक्यता आहे.Black day no entry

त्यांच्या भाषणामुळे कन्नड आणि मराठी भाषिकात तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. या मंत्र्यांना आणि खासदारांना कन्नड संघटनेचे कार्यकर्ते घेरावघालण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाषिक तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवण्याची शक्यता आहे.

या मंत्र्यांना आणि खासदारांना कन्नड संघटनेचे कार्यकर्ते घेराव घालण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाषिक तेढ निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवण्याची शक्यता आहे. त्या बरोबर सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत दादा
पाटील, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव शहरात आणि जिल्ह्यात प्रवेश करण्यास बंदी घातली असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.