बेळगाव लाईव्ह : आपल्या विविध मागण्या पूर्ण करा यासाठी मध्यान आहार कर्मचाऱ्यांनी बेळगाव जिल्हा पंचायतीसमोर निदर्शने केली आणि जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना यावेळी मागण्यांचे निवेदन दिले
मध्यान्ह आहार संघटनेने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की शासनाने २०२३ च्या अर्थसंकल्पात माध्यान आहार कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये मानधन वाढविले आहे. पण त्याबाबतचा आदेश आजवर निघालेला नाही. तातडीने याबाबत आदेश बजावून मानधन वाढविले जावे.
निवृत्त आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना एक लाख रुपये भरपाई दिली जावी. माध्यान आहार तयार करण्याच्या नियमावलीत चार तास काम असले तरी रोज सहा तासाहून अधिक काळ कर्मचारी काम करत आहेत. त्यासाठी नियमावलीत बदल केला जावा.
शिक्षकांना उन्हाळी आणि दसरा सुट्टीतही वेतन मिळते पण माध्यान आहार कर्मचाऱ्यांना मानधन दिले जात नाही. त्यांना देखील शिक्षकांप्रमाणे सुट्टीच्या काळात मानधन दिले जावे.
माध्यान आहार तयार करण्याची जबाबदारी कोणत्याही खासगी संस्थेला दिली जाऊ नये. ज्या खाजगी संस्थाना ही जबाबदारी देण्यात आली आहे, ती मागे घेतली जावी.
माध्यान आहार तयार करण्याची जबाबदारी केवळ एकाच कर्मचाऱ्यावर असून त्यासाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करत सर्व कर्मचाऱ्यांना ‘ड’ दर्जा कर्मचारी म्हणून ओळखले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष एल. एस. नायक, तुळसम्मा माळदकर, जे. एम. जैनेखान, सुमन गडाद, पार्वती कौजलगी आदी उपस्थित होते.