Tuesday, January 14, 2025

/

बेळगावात ईद-ए-मिलाद निमित्त भव्य मिरवणूक

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती म्हणजेच ईद-ए- मिलादनिमित्त भव्य मिरवणूक (जुलूस) रविवारी काढण्यात आली.

यानिमित्त मुस्लिम बांधवांकडून खास तयारी करण्यात आली होती काही संघटनांनी सामाजिक कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे.

रविवारी सकाळी ११.३० वाजता फोर्ट रोड येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला त्यानंतर मिरवणूक आरटीओ सर्कल, चन्नमा सर्कल, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी महाराज चौक संचयनी चौकमार्गे अर्सद खान दर्गा येथे सांगता झाली.

यंदा ईद ए मिलाद अनंत चतुर्दशीदिनी आल्याने मुस्लिम बांधवांनी दुसऱ्या दिवशी सण साजरा केला. याशिवाय रविवार दि. १ रोजी मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यातआला होता त्यानुसार रविवारी प्रार्थनास्थळात मुस्लिम बांधव एकत्र येवून सामूहिक मनाज पठण करण्यात आली बारा इमाम अंजुम म कमिटीतर्फे भव्य शोभायात्रा उ काढण्यात आली मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करुन शोभायात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर धर्मगुरुंना रथात बसवून मिरवणूक काढण्यात आली.

ईद ए मिलादचा दिवस जरी बदलला असला उत्साह कमी झाला नव्हता मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव मिरवणूकीत सहभागी झाले होते. प्रार्थना गीत, कव्वाली म्हणत, शोभा यात्रा काढण्यात आली ठिकठिकाणी विविध संघटनांकडून मिठाई कोल्ड ड्रिंक्स शरबत वाटप करण्यात आले. अमजद खान पठाण डॉ कुतब मकानदार यांच्या माध्यमातून असद खान दर्गाह परिसरात हजारो मुस्लिम बांधवात प्रसाद वितरण करण्यात आला.

Profession eid e milad

बेळगावातील शोभा यात्रेत आमदार राजू सेठ, माजी आमदार फिरोज सेठ यांच्यासह मुस्लिम समाजातील बांधव सहभागी झाले होते. शोभा यात्रेच्या सुरुवातीला , डी सी पी रोहन जगदीश ,शहर देवस्थान पंच समितीचे रणजित चव्हाण पाटील, गणेश महा मंडळाचे विकास कलघटगी, नगरसेवक संतोष पेडणेकर, माजी दीपक वाघेला, यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

प्रेषित मोहम्मद यांचे  संपूर्ण आयुष्य हे सहिष्णुतेचे एक उत्तम उदाहरण आहे.  मोहम्मद हे पवित्र कुराणचे चालते-बोलते स्वरूप होते. अखिल मानवजातीला शांती, समता, बंधुत्व आणि सलोख्याची शिकवण देणारे इस्लाम धर्माचे अखेरचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलाद शुक्रवारी साजरी करण्यात आली. पैगंबरांची जयंती दिवशीच अनंत चतुर्दशीदिवशी आल्याने बेळगावातील मुस्लिम बांधवांनी जुलूस रविवारी (दि. १) काढण्याचा निर्णय घेत सामाजिक सलोखा जपला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.