Wednesday, January 15, 2025

/

स्वखुशीने वाहतूक नियत्रंण करणारा सामाजिक कार्यकर्ता हरपला

 belgaum

बेळगाव लाईव्ह :प्रत्येक माणसाला एक छंद असतो अनेक जन समाजसेवा देखील छंद म्हणून करत असतात. पोलिसांनी करायचे काम स्वतः करणारा रहदारी नियत्रंण करण्यासाठी नेहमी पुढाकार घेणारा पिरनवाडी भागात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या निधन झाले आहे.

नारायण शहापूरकर राहणार पिरनवाडी यांना गेल्या वीस वर्षापासून पोलिसांप्रमाणे युनिफॉर्म परिधांनकरून पिरनवाडी मधील वाहतुकीची समस्या  सोडणवण्याठी काम करत होते. विशेषतः  रस्त्यावरील गाड्या व्यवस्थित लावणे लोकांच्या गाड्या पार्क करणे ,हातामध्ये एक शिटी आणि पोलिसांचा जुना ड्रेस घालून वाहतूक नियंत्रण  करायचं काम विना मोबदला ते करत होते.

गावामध्ये कोणतेही कार्य असो त्या कार्यामध्ये पुढाकार घेऊन नारायण सगळ्यांना मदत करायचे शांताई वृद्धाश्रम मध्ये सुद्धा कोणता कार्यक्रम असेल तर वाहतुकीत नियंत्रण करण्याचे काम न सांगता सहाय्य करण्यासाठी येत होते.

केवळ बेळगाव नव्हे तर गोव्याचे लोकांमध्ये त्याचं नाव चांगलं होतं. पिरनवाडी भागात गोव्याकडून येणारे बेळगावचे लोक, चार चाकी चालवणारे नारायणला हातामध्ये काहीतरी देऊन त्याची चौकशी करून त्यांच्या कामाचा कौतुक करत होते.Capital one

गेल्या पाच सहा दिवसांमध्ये त्याना आजार जडला पण त्यामध्ये त्यांचं काल रविवारी रात्री आठ वाजता निधन झालं सोमवारी सकाळी साडेदहा वाजता अंतिम संस्कार करण्यात आला. संपूर्ण पिरनवाडी आणि त्याचे हितचिंतक असावे हजारोच्या संख्येने उपस्थित होते.Narayan shahapurkar

या भागातील ग्रामपंचायतचे अध्यक्ष बँकेचे संचालक राजकारणी आणि समाजसेवक त्यांच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी गोव्याचे माजी सभापती राजेश पाटणेकर यांनी सुद्धा शोक संदेश पाठवला.

या भागातील संपूर्ण लोकांच्या मध्ये परिचित असणारे नारायण गेल्यामुळे संपूर्ण पिरनवाडी भागांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

स्वतः सामाजिक काम कशा पद्धतीने करावं हे एक ज्वलंत उदाहरण म्हणजे नारायण शहापूरकर त्याच्या जाण्याने बिरणवाडी मधील वाहतूक नियंत्रण ची देखरेख कोण करणार अशी स्मशानभूमीमध्ये चर्चा होत होती.

विजय मोरे
माजी महापौर बेळगाव

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.