पुढील वर्षी होणाऱ्या सांबरा येथील श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त मंगळवारी गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणत संपन्न झाला.यावेळी रेडा व पालवा सोडण्याचा विधी पार पडला. शस्त्रपूजा आणि रथाला लागणाऱ्या औदुंबरच्या लाकडाची मिरवणूक काढून पूजा करण्यात आली.
पुढील वर्षीच्या मे महिन्यात सांबरा गावामध्ये श्री महालक्ष्मी यात्रा होणार आहे. त्यानिमित्त मंगळवारी श्री महालक्ष्मी मंदिरा आवारात देवीच्या जयघोषात गाऱ्हाणे घालण्यात आले.
तत्पूर्वी हकदारांनी आणलेल्या कुऱ्हाडीची पूजा करण्यात आली. मंदिरासमोर धान्यांची आरास करून मेत्री आणि असोदी परिवाराच्या मंत्रपठण करण्यात आले. त्यानंतर रेडा व पालवा सोडण्याचा विधी झाला. धनगरी ढोल, हलगी ताशा आणि कोरवी वाद्याच्या अखंड गजर करण्यात आला. यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी यात्रेची माहिती दिली.
यात्रेसाठी 70 फूट उंचीचा रथ बनविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक औदुंबरच्या झाडाचे लाकूड पारंपरिक वाद्याच्या गजरात शेतातून आणण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीने दुर्गादेवी मंदिरात ठेवण्यात आले. गावामध्ये आज कडक वार पाळून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
पुढील वर्षी होणाऱ्या सांबरा येथील श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त मंगळवारी गाऱ्हाणे घालण्याचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणत संपन्न झाला. यावेळी रेडा व पालवा सोडण्याचा विधी पार पडला. शस्त्रपूजा आणि रथाला लागणाऱ्या औदुंबरच्या लाकडाची मिरवणूक काढून पूजा करण्यात आली. तब्बल 18 वर्षानंतर यात्रा होणार आहे. चार दिवस रथोत्सवासह नऊ दिवस यात्रा होणार आहे.
पुढील वर्षीच्या मे महिन्यात सांबरा गावामध्ये श्री महालक्ष्मी यात्रा होणार आहे. त्यानिमित्त मंगळवारी श्री महालक्ष्मी मंदिरा आवारात देवीच्या जयघोषात गाऱ्हाणे घालण्यात आले. तत्पूर्वी हकदारांनी आणलेल्या कुऱ्हाडीची पूजा करण्यात आली. मंदिरासमोर धान्यांची आरास करून मेत्री आणि असोदी परिवाराच्या मंत्रपठण करण्यात आले.
त्यानंतर रेडा व पालवा सोडण्याचा विधी झाला. धनगरी ढोल, हलगी ताशा आणि कोरवी वाद्याच्या अखंड गजर करण्यात आला. यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी यात्रेची माहिती दिली. यात्रेसाठी 70 फूट उंचीचा रथ बनविण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक औदुंबरच्या झाडाचे लाकूड पारंपरिक वाद्याच्या गजरात शेतातून आणण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीने दुर्गादेवी मंदिरात ठेवण्यात आले. गावामध्ये आज कडक वार पाळून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.