Tuesday, May 28, 2024

/

इथे मुस्लिम बांधव करतात दौडीचे स्वागत!

 belgaum

बेळगाव लाईव्ह :देशाच्या रक्षणासाठी नवरात्रीत शिव प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीचे स्वागत कॅम्प मधील मधील मुस्लिम बांधवांनी करून सामाजिक सलोखा जपण्याचा प्रयत्न केलाय.

बेळगाव शहरातील कॅम्प हा कॅन्टोन्मेंट व्याप्तीत येणारा परिसर या भागात सर्व धर्म समाज बांधव वास्तव्यास आहेत. गेली अनेक वर्षे कॅम्प भागातील सामाजिक कार्यकर्ते, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी सदस्य साजिद शेख आपल्या सहकारी मित्र परिवारासह स्वागत करत असतात.

शनिवारी दौड कॅम्प भागातून गेली त्यावेळी कॅम्प मधील कै दावल जंगू शेख परिवाराच्या वतीनं कॅटोंमेंट सदस्य साजिद शेख यांनी दौडीत सहभागी युवकांसाठी अल्पोपहार आयोजन केले.पाणी बाटल्या साखर फळे आणि बिस्कीट वितरण करण्यात आली.

 belgaum

दौड स्वामी बेकरी मारुती मंदिरा जवळ येताच साजिद शेख आणि इतर मुस्लिम बांधवांनी हार घालून भगव्या ध्वजाचे स्वागत केलं.Sajid sheikh doud

सर्व जाती धर्माचे लोक चांगले वागले पाहिजे जातीय सलोखा समाजात नांदला पाहिजे असा सामाजिक सौहार्द तेचा संदेश घेऊन कॅम्प मधील मुस्लिम बांधवांनी केलेलं कार्य केले असून कोल्हापूर प्रमाणे बेळगावात देखील सलोखा असला पाहिजे अशी भूमिका साजिद शेख यांनी मांडली.

यावेळी इब्राहिम शेख वाहिद शेख, श्री कलाई, अराफत महादेव, बशीर,प्रकाश, गोविंद, जावेद, रवी,सागर,शहीद,अमजद,राम खानोलकर,रफिक, वीणा मिरजकर, डॉ राहिला शेख आदींनी आरती करुन ध्वजाचे स्वागत केले.Dasra advt

Dasra advt

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.