बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर परिसरात खुनाच्या घटनात पुन्हा वाढ झाली आहे. शनिवारी क्षुल्लक कारणावरून गोजगा येथे युवकाचा खून झाला होता रविवारी कॅम्प भागात देखील खुनाची घटना घडली आहे.
क्षुल्लक कारणातून झालेल्या भांडणातून दोघा सख्ख्या भावांनी एका युवकाला घराबाहेर बोलावून घेऊन भांडण काढले. भांडणात त्यांनी त्या तरुणाला ढकलल्याने गटारीत पडून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र उपचारावेळी त्याचा मृत्यू झाल्यानंतर दोघा भावांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. दोघांपैकी एक भाऊ अल्पवयीन आहे. शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास अॅन्थोनी स्ट्रीट, कॅम्प येथे ही घटना घडली.
ॲरिकस्वामी अॅलेक्झांडर अॅन्थोनी (वय २५, रा. अॅन्थोनी स्ट्रीट, कॅम्प) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी अटक केलेल्या संशयितांमध्ये अठरा वर्षांचा जस्टीन व त्याच्या १७ वर्षाचा भावाचा समावेश आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत ॲरिकस्वामी व खुनातील संशयित एकाच परिसरात राहतात. शनिवारी रात्री या प्रकरणातील अल्पवयीन युवक रस्त्यावर विनाकारण शिव्या देत थांबला होता. रस्त्याने जाणाऱ्या एकाने त्याला हटकून, ‘उगीचच का शिव्या देत थांबला आहेस घरी जा’, असे सांगितले. यानंतरही तो शिव्या देतच होता. नेमक्या ॲरिकस्वामीच्या घराजवळच हा प्रकार सुरू होता. त्यावेळी ॲरिकस्वामी घरात जेवत होता. घरासमोरच थांबून सदर युवक शिवीगाळ करत असल्याने तो बाहेर आला आणि अशी विनाकारण का शिवीगाळ करतोस निघ इथून, असे सांगून तो पुन्हा घरात गेला.
ॲरिकस्वामीला बाहेर बोलावून घेत माझ्या घेत भावाला का ओरडलास, असे म्हणत पुन्हा वाद घातला. यातून एकमेकांच्या अंगावर धावून जात मारबडव सुरू झाली. यावेळी धाकट्या भावाने ॲरिकस्वामीला ढकलले. तो गटारीत जाऊन पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली.
भावाला घेऊन भांडण -परत गेलेला अल्पवयीन युवक आपल्या मोठ्या भावाला जस्टीनला घेऊन आला. सर्व प्रकार शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास घडला. ॲरिकला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डोक्याला गंभीर जखम झाल्याने रात्री १.४५ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.
केला आहे. सदर व्यक्तीचा भांडणावेळी मृत्यू झाल्याने कॅम्प पोलिसांनी गुन्हा दाखल अल्पवयीन युवकासह युवकासह दोघ भावांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. त्यांच्यावर खूनाच गुन्हा नोंदविण्यात आला.
त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता अल्पवयीन युवकाच बालसुधारगृहात तर १८ वर्षाच्य भावाची कारागृहात रवानगी केली. कॅम्पचे पोलिस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.