Monday, June 17, 2024

/

यासाठी घेतली समिती शिष्टमंडळाने घेतली भेट

 belgaum

बेळगाव लाईव्ह :1 नोव्हेंबर काळा दिन निमित्ताने यंदाही फेरी निघणार असून याबाबत फेरीचा मार्ग आणि काळ्यादिनाबाबत पोलिस आयुक्त आणि उपायुक्तांना मध्यवर्ती म ए समिति नेत्यांनी निवेदन पत्र दिले.

समिती नेत्यांनी पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा आणि पोलिस उपायुक्त रोहन जगदीश यांची भेट घेतली. 67 वर्षांपासून महाराष्ट्र एकीकरण समिती 1 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारच्या पक्षपाती निर्णयाविरोधात काळादिन पाळत आली आहे.

या दिवशी सकाळी निषेध फेरी निघते आणि त्यानंतर मराठा मंदिर येथे जाहीर सभा होते, अशी माहिती देण्यात आली.
यावेळी 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, राजेंद्र प्रसाद चौक, समादेवी गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, खडे बाजार, गणपत गल्ली, मारूती गल्ली, हुतात्मा चौक, किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, हेमुकलानी चौक, शनी मंदिर, पाटील गल्ली, फोर्ट रोड, देशपांडे पेट्रोल पंप, फुलबाग गल्ली, ताशिलदार गल्ली, कपिलेश्वर रोड, भांदूर गल्ली, तानाजी गल्ली, संभाजी उद्यान, एसपीएम रोड, शिवाजी उद्यान, बसवान गल्ली, पिंपळ कट्टा, पी. बी. रोड, नार्वेकर गल्ली, बालाजी मंदिर, आचार्य गल्ली, गाडे मार्ग, सराफ गल्ली, काकेरू चौक, बसवान गल्ली, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, डाक बंगला, कोरे गल्ली, कचेरी गल्ली, मीरापूर गल्ली, खडेबाजार, महात्मा फुले रोड, गोवावेस सर्कल, खानापूर रोड, आरपीडी कॉर्नर, सी. डी. देशमुख रोड, पहिले रेल्वे गेट, शुक्रवार पेठ, गोवावेस ते मराठा मंदिरपर्यंत फेरी काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

 belgaum

यावेळी मध्यवर्ती म. ए. समिती सरचिटणीस मालोजी अष्टेकर, माजी नगरसेवक रणजीत चव्हाण-पाटील, विकास कलघटगी, सागर पाटील, वैभव कामत, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.