बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात एपीएमसी होलसेल भाजी मार्केट मधील व्यापारी आणि जय किसान मधील होलसेल भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यात मार्केटवरून शीत युद्ध आहे हे शीत युद्ध मिटवण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी चालवले आहेत. त्यासाठी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दोन्ही कडील व्यापाऱ्यांची एक संयुक्त बैठक देखील घेतली आहे
किल्ला येथील भाजी मार्केट एपीएमसीमध्ये स्थलांतर करण्यात आले होते. मात्र, काही व्यापाऱ्यांनी नवीन जय किसान होलसेल भाजी मार्केटची उभारणी केली आहे. त्यामुळे येथील व्यापारी त्या ठिकाणी स्थलांतर झाल्यामुळे एपीएमसी भाजी मार्केट ओस पडले आहे. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांनी एपीएमसीमध्ये भाजी मार्केट सुरू करावे, अशी मागणी केली आहे. मात्र, जय किसानमधील व्यापाऱ्यांनी याला नकार दिला आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी मंगळवारी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन सामंजस्याने तोडगा काढण्याची सूचना केली. बैठकीला ए पी एम सी आणि जय किसान भाजी मार्केटचे व्यापारी उपस्थित होते.
सकाळच्या वेळी एका भाजी मार्केटमध्ये व सायंकाळी दुसऱ्या भाजी मार्केटमध्ये बाजार भरवावा, अशी सूचना एपीएमसीमधील व्यापाऱ्यांनी केली. मात्र ही मागणी जयकिसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी मान्य केली नाही. सुरुवातीपासून एपीएमसीमधील व्यापाऱ्यांनी आम्हाला पोटभाडे म्हणून बैठकीला एपीएमसी व जय ठेवून वेठीस धरले होते.
त्यामुळे नवीन किसान भाजी मार्केटचे व्यापारी भाजी मार्केट निर्माण करण्याची वेळ आमच्यावर आली. आता या भाजी मार्केटमध्ये शेतकऱ्यांची वर्दळ कमी झाल्यानंतर आमच्यावर आरोप करण्यात येत असल्याचे जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सांगितले. दोन्ही भाजी मार्केट सुरू राहण्याची गरज आहे. त्यामुळे आपापसातील वाद सामंजस्याने सोडवा. यावर तोडगा निघाला नाही तर पुढील बैठकीला आमदार, खासदारांना
निमंत्रित करावे लागेल. बैठकीला जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी हर्षल भोयर तसेच व्यापारी उपस्थित होते. आठवडाभराच्या कालावधीत दोन्ही भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी सामंजस्याने तोडगा काढला नाही तर पुन्हा दोन्ही भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.