बेळगाव लाईव्ह : गेल्या आठवड्या भरापासून अनगोळ येथील संत मीरा शाळेच्या मागील बाजूस असलेल्या वनराई परिसरात कोणत्या प्राण्याचा वावर आहे याचा तपास लावण्यासाठी वन खात्याने मोहीम आखली आहे.
शुक्रवारी सकाळी वन खात्याचे या भागात सर्च ऑपरेशन राबवून जाळी लावली आहेत या परिसरात कोणत्या प्राण्याचा वावर आहे याचा तपास केला जात आहे.
स्थानिक लोकांनी बिबट्या किंवा बिबट्या सदृश प्राणी असल्याचा दावा केला असला तरी वन खात्याने याला दुजोरा दिला नसून अद्याप तपास सुरू असल्याचे म्हटले आहे.
शुक्रवारी देखील त्या प्राण्याचे ठसे स्थानिक लोकांना दिसले त्यामुळे भयभीत झालेल्यांनी वन खात्याला पाचारण केले त्या नंतर वन खात्याने शोध मोहीम राबवली आहे.
या परिसरामध्ये वन खात्याने सीसीटीव्ही अथवा ट्रॅप कॅमेरे लावावे जेणेकरून बिबट्या सदृश्य प्राणी कॅमेऱ्यात कैद होईल ट्रॅप त्यामुळे खुलासा होईल. अशी देखील मागणी या निमित्ताने वाढू लागली आहे.या परिसरात नागरिकांची वर्दळ असते जवळपास शाळा आहे त्यामुळे वन खात्याने याचा सोक्ष मोक्ष लावण्याची गरज आहे.
मागील महिन्यात शास्त्री नगरात आणि शिवाजी नगरात चक्क नागरी वस्ती मधून कोल्हा आढळला होता त्याला जेरबंद करण्यात आले होते एकूणच वन्य जिविंचा वावर शहरी वस्तीकडे वाढू लागला आहे.
मागील वर्षी बिबट्या रेस कोर्स जंगलात वास्तव्य करून होता त्यावेळी तो ‘बेळगांवकर’ झाला होता यावर्षी अनगोळ मध्ये जर वास्तव्य करून असेल तर तो ‘अनगोळकर ‘ होईल असे मीमस देखील सोशल मीडियावर फिरू लागले आहेत.