Sunday, January 5, 2025

/

होंडा इंडिया टॅलेंट कप शर्यतीत विवेक कपाडियाचे सुयश

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगावचा होतकरू मोटरसायकल रेसर विवेक रोहित कपाडिया याने नुकत्याच पार पडलेल्या इडीमिटसू होंडा इंडिया टॅलेंट कप एनएसएफ २५० आर 2023 साठीच्या एमआरएफ एमएमएससी एफएमएससीआय इंडियन नॅशनल रेसिंग चॅम्पियनशिप या राष्ट्रीय पातळीवरील मोटरसायकल शर्यतीमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

इंडियन नॅशनल मोटरसायकल चॅम्पियनशिपच्या गेल्या 21 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या उत्साही हंगामातील इडीमिटसू होंडा इंडिया टॅलेंट कप एनएसएफ २५० आर साठीच्या पाचव्या फेरीत होंडा रेसिंग इंडियाच्या चमुतील युवा मोटरसायकल स्वारांनी चमकदार कामगिरी नोंदविली. त्यामध्ये बेळगावच्या विवेक रोहित कपाडिया याचा देखील समावेश होता.

ज्याने आपल्या मोटरसायकल चालनाचे उत्तम प्रदर्शन घडवत शर्यतीत तिसरा क्रमांक मिळविला. शर्यतीतील मोटरसायकलपटूंचे यश फक्त त्यांचे असामान्य कौशल्यच नव्हे तर दृढनिश्चय आणि समर्पण दर्शवणारे ठरले. विवेक कापडिया हा गेल्या 2018 पासून होंडा रेसिंग इंडिया टीमचा सदस्य आहे.Kapadia

त्याने होंडा इंडिया टॅलेंट कपमध्ये आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी बजावली असून 2020 मध्ये झालेल्या सीबीआर 150 आर श्रेणीच्या मोटरसायकल शर्यतीमध्ये तो उपविजेता ठरला होता. यामुळे पुढच्या श्रेणीत बढती मिळालेल्या विवेकने तिच्या वर्गात सर्वोत्तम अशी खास मोटरसायकल चालवत 250 एनएसएफसह मोटो जीपीएस 3 श्रेणीच्या शर्यतीत भाग घेतला होता. आपल्या त्या मोटरसायकलसह त्याने आपल्या हा दुसऱ्या वर्षीचा मोसम गाजवला आहे.Capital one

2023 इडीमिटसू होंडा इंडिया टॅलेंट कप एनएसएफ २५० आर ही शर्यत देशातील प्रतिष्ठेच्या मोटरसायकल शर्यतींपैकी एक असून जी तीव्र स्पर्धा असलेली उत्कंठावर्धक शर्यत म्हणून ओळखली जाते.

देशभरातील मातब्बर रेसर मोटरसायकलपटुंचा सहभाग असणाऱ्या या शर्यती मधील यावेळचे विवेक कापाडिया याचे यश त्याचा होंडाचा चमू आणि संपूर्ण रेसिंग समुदायासह बेळगावसाठी अभिमानास्पद आहे.Dasra advt

इडीमिटसू होंडा इंडिया टॅलेंट कप एनएसएफ २५० आर यशाबद्दल विवेकचे सर्वत्र विशेष करून मोटरसायकल रेसिंग क्षेत्रात अभिनंदन होत आहे.Dasra advt

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.