बेळगाव लाईव्ह : महानगरपालिका बेळगाव यांच्या सफाई कर्मचाऱ्यांचे चालू असलेल्या आंदोलनामुळे कंग्राळी खुर्द गावच्या मुख्य रस्त्यावर मागील आठ दहा दिवसापासून कचरा पडून होता त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले होते त्यामुळे रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना सुद्धा या कचऱ्यामुळे झालेल्या दुर्गंधीचा सामना करावा लागत होता.
ही बाब ग्रामपंचायत सदस्यांच्या लक्षात येतात कंग्राळी गावातील ग्रामपंचायत अध्यक्ष सदस्य व कंग्राळी ग्रामस्थ यांनी उपमहापौर रेश्मा पाटील व स्थायी आरोग्य समिती अध्यक्ष रवी धोत्रे यांना निवेदन देऊन तो केर कचरा काढण्यास भाग पाडले.
मागील दोन दिवसापूर्वी सुद्धा गणेश विसर्जन झाल्याच्या नंतर मार्कंडे नदीच्या किनाऱ्यावरील कचरा सुद्धा याच ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायत सफाई कर्मचाऱ्यांना घेऊन मार्कंडेय नदीचा परिसर स्वच्छ केला होता.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य यल्लाप्पा पाटील,प्रशांत पाटील, राकेश पाटील, वैजनाथ बेन्नाळकर,विनायक कम्मार,महेश धामणेकर या सदस्यांनी रात्री उशीरा ९.३० वाजेपर्यंत उपस्थित राहून रामदेव गल्ली समोरील मेन रोडचा कचरा ऊचलण्यास महानगरपालिकेला भाग पाडले.
कंग्राळी खुर्द गावचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी चालू असलेली या सदस्यांची धडपड बघता गावातून यांची प्रशंसा होत आहे.
ग्राम स्वच्छतेचा नारा देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची 2 ऑक्टोंबर झाली आहे त्या अनुषंगाने सर्वत्र स्वच्छ भारत नारा गाजत असला तरी या ग्राम पंचायत सदस्यांची तळमळ पाहता नक्कीच स्वच्छ भारत साठी एक पाऊल पुढे म्हणावे लागेल.