बेळगाव लाईव्ह : घरावरील टेरेस वर बेकायदेशिररित्या उगवलेला आणि घरात साठवून ठेवलेला गांजा जप्त करून एकास अटक केली आहे.
रोहन महादेव पाटील वय 23 रा. घर क्रमांक 294/ 1 रामदेव गल्ली सोनार गल्ली ( बोळ) वडगाव असे आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहिती वरून शहापूर पोलीस निरीक्षक एस एस सिमानी आदी सहकाऱ्यांनी धाड टाकून ही कारवाई केली आहे.
पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा टाकून तो राहत असलेल्या भाड्याच्या घराच्या गच्चीवर उगवलेल्या कच्च्या गांजाची 23 रोपे (1700 ग्रॅम वजनाची )किंमत 45,600/-
आणि घरात ठेवलेले 60 ग्रॅम गांजाच्या बिया आणि पाने त्याची किंमत 3,000/ असे दोन्ही मिळून एकूण 48,600/- किमतीचा गांजा जप्त करत त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. शहापूर पोलिसांनी अधिक तपास चालवला आहे.
पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त सदर कारवाई केल्या बद्दल शहापूर पोलिसांचे अभिनंदन केले आहे