बेळगाव लाईव्ह :बेळगाव धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी जमीन संपादन सर्व्हे करायला आलेल्या अधिकाऱ्यांना शनिवारी संतप्त शेतकऱ्यांनी विरोध करत पाचव्यांदा परतावून लावले.
रेल्वे मार्ग सर्व्हे करण्यासाठी गर्लगुंजी परिसरात पोलीस बंदोबस्तात रेल्वे अधिकाऱ्यानी पोलिसांना पाचारण केले होते यावेळी खानापूर नंदगड पोलीस निरीक्षक आणि दोघा पोलीस सब इन्स्पेक्टर पोलिस फौज फाटा घेऊन बंदोबस्तात दाखल झाले होते त्यावेळी आलेल्या गर्लगुंजी, नंदिहळी ,नागेनहट्टी,के के कोप्प भागातील शेतकऱ्यांनी सर्वे अधिकाऱ्यांना वापस धाडले.
याप्रसंगी पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक आणि तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी दोन्ही सर्वे चे परीक्षण केले आणि आपल्या विभागातर्फे रिपोर्ट सरकार कडे सुपूर्द करतो असे म्हणणे शेतकऱ्या समोर मांडले.
या अगोदर गर्ल गुंजी भागात प्राथमिक सर्व्हे साठी आलेल्या अधिकाऱ्यांना चारवेळा शेतकऱ्यांनी वापस धाडले होते पण शनिवारी मोठा फौजफाटा घेऊन आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विरोध पाहून वापस जावे लागले. यावेळी शेतकऱ्यांनी आपला रेल्वे मार्गाला विरोध नसून फक्त पडीक जमिनीतून मार्ग करावा अशी मागणी केली होती ज्यामुळे पाच की मी अंतर ही कमी होईल आणि सुपीक जमिनी वाचतील असा प्रस्ताव शेतकऱ्यांनी रेल्वेला दिलेला होता.
सहा आमदार 2 खासदार 2 विधान परिषद सदस्य 2 माजी जिल्हा पंचायत सदस्य यांची पत्रे आणि 5 ग्राम पंचायत ठराव या मार्गाच्या विरोधात जिल्हा अधिकारी रेल्वे मंत्रालय आणि मुख्यमंत्री प्रधानमंत्री याना निवेदन दिलेली होती त्यानुसार रेल्वे विभागाने पडीक जमिनीतून सर्वे केला आणि 80 टक्के सर्वे काम झाल्याचं पत्र ही शेतकऱ्यांना मिळालं पण नंतर खासदार मंगला अंगडी यांच्या दबावामुळे पहिलाचा मार्ग करावा असे नैऋत्य रेल्वे हुबळीच्या व्यवस्थापकांना भेटून विनंती केली असे माहिती हक्क मधून शेतकऱ्यांना माहिती मिळाली.त्यामुळे मंगला अंगडी यांच्या नावाने शेतकरी आक्रोश करत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला.
शनिवारी सुरुवातीला रेल्वे अधिकारी पोलिस आणि शेतकरी यांच्यात वाद झाला त्यावेळी शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रे आणि बैठकीचे कागदपत्र अधिकाऱ्यांना दाखवले त्यानंतर शेवटी खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी जागेवर भेट दिली आणि माहिती घेतली. जर शेतकऱ्यांना त्रास दिला तर पर्यायी लाईन पण व्हायला देणार नाही असा इशारा देत प्रोजेक्ट कॅन्सल करण्यासाठी साठी प्रयत्न करणार असल्याचे शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले.
यावेळी माजी एपीएमसी सदस्य संजय मादार, नंदिहळी ग्राम पंचायत उपाध्यक्ष मल्लीकार्जून लोकूर,शेतकरी प्रसाद पाटील, राजेंद्र पाटील,परशराम जाधव,किरण लोंढे,रमेश राऊत,गजानन जाधव,मारुती राऊत ,हणमंत मेलगे,पुंडलिक मेलगें,यशवंत पाटील,सोमनाथ पाटील, कल्लाप्पा लोहार ,महेश पाटील,संतोष पाटील,भुजंग धामणेकर,आणि इतर शेतकरी उपस्थित होते.