बेळगाव लाईव्ह : यंदा पावसाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे बेळगाव खानापूर सह सगळीकडेच दुष्काळ पडला आहे मात्र बेळगाव आणि खानापूर तालुक्याला राज्य सरकारने दुष्काळ पीडित तालुक्यामधून वगळले होते तेव्हापासूनच आंदोलने सुरू होती. शेतकरी आणि अनेकांच्या मागणीला यश आले आणि बेळगाव आणि खानापूर तालुक्याला दुष्काळ पिढीत तालुका म्हणून घोषणा करण्यात आली याचे श्रेय बेळगावच्या जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना जाते.
राज्य सरकारने बेळगाव आणि खानापूर तालुक्याचा देखील दुष्काळ पीडित तालुक्यात समावेश केल्याने शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे आणि चक्क बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांचे स्वागत जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष धन्यवाद दिले आहेत.
बेळगाव,खानापूर तालूके खरिप हंगामात दुष्काळग्रस्त झाले असता ते वगळल्याने शेतकऱ्यांची मोठी आंदोलन होत असतानां प्रत्यक्ष पहाणी करुनच दुष्काळ जाहीर करा म्हटल्यावर जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यासह प्रत्यक्ष पहाणी करुन सर्व अहवाल सरकारला पाठवून दिल्यानंतर दोन्ही तालूके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केल्याने आज नांगरधारी शेतकरी संघटना राज्यअध्यक्ष रवी पाटील,बेळगाव तालूका रयत संघटना अध्यक्ष राजू मरवे तसेच फेसबूक फ्रेंड सर्कलचे मुख्य संतोष दरेकर यांनी जिल्हाधिकारी साहेबांचे पुष्पगुच्छ देऊन धन्यवाद दिले.
ऊस उत्पादक शेतकरी,वाहतुकदार त्याचबरोबर तोडणाऱ्यांचाही प्रश्न आत्काळ मार्गी लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा म्हणून विनंती करण्यात आली.त्यावर मी कारखान्याना सख्त ताकित दिली आहे त्याचबरोबर यावर्षी ऊस उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना जास्त भाव मिळण्यास अनुकूल वातावरण आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या विश्वासू वजन काट्यावर उस वजन करुन घेऊन प्रामाणीकपणे पुराव्यासह वितरित करुन शेतकरी प्रामाणीक असतो हे दाखवून द्या अशी सुचना केली असल्याचे सांगत शेतकरी जर प्रामाणिकपणे ऊस वितरित करतील तर कारखान्यानीं चुका केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यास प्रशासन मागेपुढे पहाणार नाहीत असे सांगितले.