बेळगाव लाईव्ह : सध्या बेळगाव महापालिकेच्या राजकारणावर सत्ताधारी गटाचे नगरसेवक शुक्रवारी राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. महापौर शोभा सोमनाचे यांनी बुधवारी राज्यपालांना पत्र लिहीत बेळगाव मनपात सध्या चाललेल्या परिस्थितीची जाणीव करून देताना अनेक तक्रारी केल्या होत्या.
शुक्रवारी राज्यपाल थावरचंद गेहलोत हे बेळगाव भेटीवर आहेत ते व्ही टी यू मधील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यावेळी महापौर उपमहापौर सत्ताधारी गट नेत्यांसह दक्षिण आमदार एकूण सात जणांचे शिष्टमंडळ राज्यपालाना भेटणार आहे.
बुधवारी महापौरांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या विरुद्ध तक्रारी केल्या होत्या भेटीची वेळ मागितली होती त्यावर राज्यपाल बेळगाव भेटीवर महापौर नगरसेवकांना भेटण्याची शक्यता आहे.
राज्यपालांना भेटणाऱ्या शिष्टमंडळात खासदार मंगला अंगडी, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ,माजी आमदार अनिल बेनके आदींचा समावेश असण्याची शक्यता आहे.
भाजपच्या शिष्टमंडळाला राज्यपाल काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.