Friday, October 18, 2024

/

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

 belgaum

Sidh cmमी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विकास झाला तरच समानता शक्य आहे. प्रत्येकाला त्यांचा वाटा आणि संधी मिळाली पाहिजे, असे मत मांडले होते. तेच मत माझे आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.
शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलच्या वतीने धनगर समाजाचा मंगळवारी (तारिख 3) रोजी जिल्हा क्रीडांगणावर आयोजित नवव्या राष्ट्रीय अधिवेशनात ते उपस्थित होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, मी नेहमीच या जातीव्यवस्थेच्या विरोधात आहे. वंचित समाजाने त्यांच्या घटनात्मक हक्कांसाठी संघटित होणे चुकीचे नाही. वंचित समुदाय त्यांच्या हक्क आणि राजकीय शक्तीपासून वंचित आहेत कारण ते संघटित नाहीत आणि त्यांच्यात नेतृत्व विकसित होत नाही.
आपल्या समाजाला राजकीय इतिहास आहे. सांस्कृतिक वैभव आहे. हक्का-बुक्कापासून अहिल्याबाई होळकरांपर्यंतचा इतिहास आपल्याकडे आहे. मात्र संघटनेच्या कमतरतेमुळे आम्हाला श्रेय मिळू शकले नाही. आपला समाज जातीय आणि भेदभाव करणारा आहे. त्यामुळे संधींच्या वाटपात भेदभाव केला जातो. या सगळ्याची भरपाई करण्यासाठी संघटना आणि संमेलने आवश्यक आहेत. सरकार देत असलेल्या योजना एका समाज, एक धर्म, एका जातीपुरत्या मर्यादित नाहीत. त्या सर्व जातीतील लोकांचे जीवन सुकर करण्यासाठी आहेत.
हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी अधिवेशनाचे उद्घाटन केले. शेफर्ड इंडिया इंटरनॅशनलचे अध्यक्ष माजी मंत्री एच. विश्वनाथ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कागिनेले कनक गुरुपीठाचे श्री श्री निरंजनानंद स्वामीजी, ईश्वरानंदपुरी स्वामीजी, सिद्धराममानंदपुरी स्वामीजी आणि अर्जुनभाईपुरी स्वामीजी यांची दिव्य उपस्थिती होती. यावेळी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, नगरविकास मंत्री बैरती सुरेश, गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री महादेव जानकर, दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री डॉ. रमाशंकर शिंदे, शेफर्ड इंटरनॅशनल उपाध्यक्ष एच. एम. रेवण्णा, माजी मंत्री बंडेप्पा कांशमपूर, आंध्र प्रदेशचे मंत्री के. व्ही. उषाश्री चरण, अहिल्याबाई होळकर यांचे नातू भूषणराजे होळकर, गुजरातचे नेते सागर रायका आणि विविध राज्यातील धनगर समाजाचे नेते सहभागी झाले होते. या कार्यक्रमातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शक्तीप्रदर्शन केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.