Friday, November 22, 2024

/

आपला दृष्टिकोन वास्तवात बदलवणारे उद्योजक अजित पाटील

 belgaum

ईव्ही क्षेत्रात क्रांती घडवण्यासाठी ‘रिव्होट एनएक्स 100’ सज्ज

बेळगावच्या हृदयात एक स्वप्न साकारत असून जे भारतीय इलेक्ट्रॉनिक स्कूटर बाजारपेठेत आपली अमिट मुद्रा उटवणार आहे. दूरदृष्टीचे सीईओ अजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील रिव्होट मोटर्स ही कंपनी आपण निर्माण केलेल्या रिव्होट एनएक्स 100 या वैशिष्ट्यपूर्ण इलेक्ट्रिक स्कूटरचे अनावरण करून बाजारात खळबळ उडवून देण्यास सज्ज झाली आहे. याद्वारे सीईओ अजित पाटील यांचा जागतिक दर्जाच्या वाहनाची बेळगावमध्ये निर्मिती करण्याची आपला भव्य महत्त्वाकांक्षी कल्पना -दृष्टिकोन साकार होणार आहे.

बेळगावात तयार झालेली रिव्होट एनएक्स 100 ही भारतातील सर्वाधिक अपेक्षित इलेक्ट्रिक स्कूटर असून जी फक्त स्कूटर नसून नवीनता आणि गुणवत्ता यांचे प्रतीक आहे. आधुनिक तंत्रज्ञानासह खास वैशिष्ट्यांमुळे अपेक्षा ओलांडणारी ही स्कूटर दर्जेदार अशी आहे. रिव्होट एनएक्स 100 ही इलेक्ट्रिक स्कूटर सध्या बाजारपेठेतील अनावरणाच्या उंबरठ्यावर आहे. रिव्होट मोटर्सने या संदर्भात अधिकृत घोषणा करताना या क्रांतिकारी इलेक्ट्रिक स्कूटरचे येत्या 23 ऑक्टोबर 2023 रोजी बाजारात पदार्पण होईल असे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे त्या दिवशीच इच्छुक मंडळी आपल्या स्वतःच्या मालकीच्या एनएक्स 100 साठी बुकिंग करू शकणार आहेत. अजित पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निरीक्षण व संशोधनाअंती मोठ्या परिश्रमाने या इलेक्ट्रिक स्कूटरची निर्मिती केली आहे. ही स्कूटर संपूर्णपणे स्थानिक बनावटीची आहे. एका संपूर्ण चार्जिंगवर तब्बल 280 कि.मी. धावणाऱ्या या स्कूटरची खास करून बूट स्टोरेज आणि डॅश कॅम ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्याचप्रमाणे योग्य आकारमानाच्या 5.7 केडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरी पॅकमुळे एनएक्स 100 ही इतर इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा वेगळी आहे. ही बॅटरी आयपी67-रेटेड असून पाणी आणि धुळीपासून मजबूत संरक्षण देते. एनएक्स 100 स्कूटरचे आणखी एक आकर्षण म्हणजे 7 इंची टच स्क्रीनडिस्प्ले जो वापरकर्ता अनुकूल असा आहे. इलेक्ट्रिक स्कूटर उद्योगात या स्कूटरवर पहिल्यांदाच डॅश कॅमेऱ्याची सोय करण्याद्वारे रिमोट मोटर्स त्यामध्ये आद्य ठरले आहेत. चालकाच्या सुरक्षा आणि सोयीच्या दृष्टीने त्यांनी आणखी एक पाऊल उचलताना स्कूटरमध्ये सेंसर ओपनिंग बूट स्टोरेज उपलब्ध केले. हे देखील या विभागात प्रथमच असून फक्त सेंसर समोर पाऊल फिरवून स्टोरेज बॉक्स सहजगत्या उघडता येऊ शकतो. एकदा का बुकिंगचा कालावधी समाप्त झाला की सहा महिन्यानंतर या स्कूटरची डिलिव्हरी देण्याचे वेळापत्रक कंपनीने आखले आहे.

सीईओ अजित पाटील यांचा बेळगावात जागतिक दर्जाची इलेक्ट्रिक वाहने बनवण्याचा व्यापक मोठा विचार करण्याचा दृष्टिकोन यामुळे रिव्होट मोटर्स सध्या इलेक्ट्रॉनिक्स स्कूटर बाजारपेठेतील इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात (ईव्ही) क्रांती घडवण्याच्या तयारीत आहे. रिव्होट एनएक्स 100 ही इलेक्ट्रिक स्कूटर हणजे एका लहान गावाची स्वप्न साकार करण्याची ताकद आणि नवीनता याची साक्ष आहे. महत्वाकांक्षा, कल्पकता आणि समर्पण या तीन गोष्टी एकत्र आल्या की काहींही अशक्य नाही हे रिव्होट मोटर्सने दाखवून दिले आहे. आता 23 ऑक्टोबरचे काउंटडाऊन सुरू झाले आहे आणि रिव्होट एनएक्स 100 च्या स्वरूपात जग शहरी गतिशीलतेची आतुरतेने वाट पाहत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.