बेळगाव लाईव्ह: अस्वलाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना कापोली गावाजवळील घोस खुर्द येथे उघडकीस आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खानापूर तालुक्यातील कापोली गावाजवळील घोस खुर्द गावातील शेतकरी भिकाजी मिराशी हे शनिवारी शेताकडे गेले होते त्यांनी शेतात जात असल्याची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली होती मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला होता मात्र त्यांचा कुठेही पत्ता लागला नव्हता.
अखेर रविवारी सकाळी कुटुंबीय त्याचा शोध घेण्यासाठी शेतात गेले असता त शेतात रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतादेह आढळून आला.
या घटनेची माहिती समजताच खानापूर तालुक्याचे आमदार विठ्ठलराव हलगेकर आणि भाजप नेते अरविंद पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांचे सांत्वन केले.
याबाबतचे वृत्त समजताच वनविभागाचे अधिकारी व पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. खानापूर तालुक्यात बहुतांश ठिकाणी जंगल आहे त्यामुळे वन्यजीवांचा वावर मोठ्या प्रमाणात या तालुक्यात असतो त्यामुळे अनेकदा शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांवर जंगली प्राणी हल्ले करत असतात. या घटनेत मयत शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशीही मागणी यानिमित्ताने उपस्थित झाली आहे.