बेळगाव लाईव्ह :पोलाईट्स (सेंट पॉल हायस्कूल) माजी विद्यार्थी संघटना आयोजित सेंटपॉल कॉलेज मैदानावर ५५ व्या फादर एडी स्मृती माध्यमिक आंतरशालेय १७ वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या चुरशीच्या आणि रंगतदार अंतिम सामन्यात गतविजेता सेंट पॉल्स स्कूल संघाने बलाढ्य लव्ह डेल सेंट्रल स्कूल संघावर १-१ अशा बरोबरीनंतर घेण्यात आलेल्या पेनल्टी शूटआउटवर ५-४ (६-५) असा निसटता विजय संपादन करत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू हा पुरस्कार लव डेल स्कूल्स युनूस तर सर्वोत्कृष्ट गोलरक्षक हा पुरस्कार सेंट पॉल्स स्कूलचा उजेर पठाण, तर स्पर्धेतील उदयोन्मुख फुटबॉलपटू पुरस्कार सेंट झेवियर स्कूलचा गौरांग उजगावकर याला देण्यात आला.
मंगळवारी सेंट पूर्वार्धात पॉल्स हायस्कूलच्या मैदानावर झालेलाअंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झाला. पूर्वार्धात १९ व्या मिनिटाला लव्ह डेल स्कूलचा उजवा विंगर डॅनी मार्टिनयांने संघाचा पहिला गोल करून १-० अशी आघाडी घेऊन दिली. ही आघाडी लव्ह डेल स्कूल संघाने मध्यंतरापर्यंत राखली. उत्तरर्धात दोन्ही संघांनी परस्परावर आक्रमक चढाया रचल्या. दोन्ही संघातील आघाडी फळीतील स्कूल फुटबॉलपटुनी एकमेकाची बचाव फळी भेदण्यासाठी अनेक प्रयत्न केले. लव्ह डेल स्कूल संघाच्या ही गोलमुखाजवळ सेंट पॉल्स
स्कूलचा कर्णधार जोसवा वाज याला लव्ह डेल स्कूलच्या बचाव फळीतील फुटबॉलपटूंनी त्याला पाडवल्यामुळे, पंच अमीन पिरजादे यांनी सेंट्रल स्कूल ला पेनल्टी बहाल केली या संधीचा फायदा घेत कर्णधार जोसवा वाज याने अचूक गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. शेवटी पंचांनी पेनल्टी शूटआउट वर निर्णय घेतला.
अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ, फादर साईओ अब्रु, फादर यांच्याशी विजेत्या उपविजेत्या संघांना आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत पंच म्हणून अमीन पिरजादे समर्थ बांदेकर इम्रान बेपारी यांनी काम पाहिले. सेंट पॉल्स हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू, उपाध्यक्ष परेश मुरकुटे, सेक्रेटरी कटारिया स्पर्धा आयोजक अध्यक्ष अमित पाटील आणि सदस्य यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
सेंट पॉल विरुद्ध लव्ह डेल स्कूल या अंतिम सामन्यात लव्ह डेल संघने प्रभावी कामगिरी केल्याने हा सामना चुरशीचा झाला होता. लव्ह डेल संघातील बहुतांश खेळाडू हॉस्टेल मध्ये शिकणारे उत्तर पूर्व भागातील होते त्यांचा खेळ वेगवान होता मात्र शेवटच्या क्षणी महत्वाच्या खेळी केल्याने पॉल संघाला विजय मिळवता आला.
सेंट पॉल हायस्कूल बेळगाव संघाने या संपूर्ण स्पर्धेत त्यांचे कौशल्य आणि दृढनिश्चय दाखवून शेवटी चॅम्पियनशिप जिंकली. हृदयाचे ठोके रोखून बघणाऱ्या प्रेक्षकांचे वाढत होते सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला जिथे दोन्ही संघांनी लवचिकता दाखवली.