Thursday, May 30, 2024

/

शासकीय स्पर्धांतून मूलभूत सुविधांचा अभाव

 belgaum

बेळगाव  लाईव्ह  :खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केवळ स्पर्धेचे आयोजन करून उपयोग नाही तर आयोजनात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची सरकारची गरज आहे. बेळगावात शनिवारी घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय कराटे स्पर्धा दरम्यान हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

कराटे स्पर्धेत जखमी झालेल्या खेळाडूंना तत्काळ उपचार करण्यासाठी रुग्णवाहिका, पाणी प्रथम उपचार कीट आदी सुविधा नसल्याने खेळाडूंना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. जखमी झालेल्या खेळाडूंना उपचारासाठी दाखल करण्यात आले जखमी खेळाडूंच्या पालकांना दुपारी कल्पना देण्याऐवजी सायंकाळी कल्पना देण्यात आल्याचा बेजबाबदार पणाचा प्रकार समोर आला आहे त्यामुळे स्पर्धा आयोजक अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी वाढू लागली आहे.

स्पर्धेत आयोजकाकडून पायाभूत सुविधांचा अभाव आणि रुग्णवाहिका नसल्यामुळे स्पर्धेला खीळ बसली केवळ दैव बलवत्तर म्हणून मोठी हानी झाली नाही मात्र अधिकाऱ्यांचा बेजबाबदार पना उघड झाला आहे.

 belgaum

सार्वजनिक शिक्षण विभागातर्फे आयोजित तालुकास्तरीय कराटे स्पर्धा कृष्णदेवराय सर्कलजवळील क्रीडा वसतिगृहात पार पडली. तालुका क्रीडा अधिकारी आणि शिक्षण क्षेत्र अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात 150 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तथापि, मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव आणि रुग्णवाहिका नसल्यामुळे स्पर्धेला खीळ बसली.
धक्कादायक म्हणजे त्यानंतरच खेळाडू जखमी झाल्याची घटना घडली.Sports injured

उपस्थित पालकांनी खेळाडू आणि प्रशिक्षणार्थींना योग्य आहार, पाणी आणि वैद्यकीय उपचार देण्यास आयोजक अपयशी ठरल्याबद्दल निराशा व्यक्त केली.
पाणी आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात अयशस्वी ठरल्याने अधिकाऱ्यांचे निष्काळजीपणा स्पष्ट होते, ज्यामुळे दुर्दैवी घटना घडल्या. त्यामुळे विद्यार्थी पृथ्वीराजला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आणि ही घटना आता मेडिकल-लीगल केस बनली आहे.

तालुका गट शिक्षण अधिकारी लीलावती हिरेमठ आणि स्पर्धा समन्वयक जी एम पटेल या दोघांनी स्पर्धा दरम्यान जखमी खेळाडूसाठी रुग्णवाहिका पिण्याच्या पाण्याची इतर सुविधा न केल्याने संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कारवाई केली जावी अशी मागणी वाढू लागली आहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.