बेळगाव लाईव्ह:आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी अलारवाड पाणी पुरवठा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदारांसह पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.
बेळगावच्या जनतेला पाण्याची उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हा विषय आसिफ (राजू) सेठ यांच्या जाहीरनाम्यात होता.
“माझ्या आश्वासनांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू झाली आहे, आणि लवकरच विकासकामांना सुरुवात होणार आहे; पूर्वी लोकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले जात होते,आणि आता मी दिलेली आश्वासने पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे.
माझ्या मतदारसंघातील लोकांच्या फायद्यासाठी वैयक्तिकरित्या निश्चित केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कामाच्या गुणवत्तेशी कोणत्याही स्तरावर तडजोड करणार नाही,” आमदार सेठ म्हणाले.
शांतता समिती बैठक
गुरुवारी दुपारी आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी गणेशोत्सव आणि ईद मिलादच्या निमित्ताने शांतता समिती बैठक घेतली. बैठकीला शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी उपस्थित होते. शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी कोणत्या खबरदारीच्या उपाययोजना केल्या जातील, यासह विविध गोष्टींवर चर्चा करण्यात आली.
बेळगावच्या जनतेने शहरात शांतता व सुव्यवस्था राखून बंधुभावाने सणाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आमदार सेट यांनी केले.