बेळगाव लाईव्ह:तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणारा आणि त्यांच्या समस्या जाणून घेणारा खंदा समर्थक म्हणून आता कडोली ग्रामपंचायत अध्यक्ष सागर पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या कर्तृत्ववान कार्यामुळेच त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे.
नुकतीच झालेल्या निवडणुकीत त्यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष पदावर आपला शिक्कामोर्तब करत अनेक सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
सामाजिक कार्याचे भान मनी ठेवून त्यांनी आपल्या ग्रामपंचायत सदस्यांपासून ते अध्यक्षापर्यंत खडतर प्रवास करत गरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. दरम्यान याआधीही त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोपून दिले आहे. कोणत्याही गरिबाला मदत लागली की ते सहकार क्षेत्राच्या माध्यमातून धावून जात त्याचबरोबर त्याला इतर पद्धतीनेही मार्गदर्शन करत आणि त्याच्या अडचणी दूर करत त्यांच्या या सेवाभावी सामाजिक कार्यामुळेच त्यांची प्रचिती झाली आणि ते सर्वसामान्यातून नावाजु लागले. त्यांचे हे कार्य मोलाचे आहे आणि या मोलाच्या कार्याची पोच पावती म्हणूनच कडोली ग्रामपंचायत अध्यक्षांच्या खुर्चीवर बसण्याचा मान त्यांनी मिळविला.
शेतकरी कुटुंबातील असणारे सागर पाटील हे गरिबांचे कैवारी म्हणून ओळखले जात आहेत. त्यांचे कार्य अनेकांना प्रेरणादायी ठरते. कमी वयातच त्यांनी ग्रामपंचायत अध्यक्षाची धुरा सांभाळली असून यापुढे येणाऱ्या अडचणीवर मात करत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी ते प्रयत्नशील झाले आहेत. कोणत्याही नागरिकाला अडचण असेल तर ते स्वतः धावून जातात. रात्री अपरात्री कोणताही विचार न करता त्यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर आघाडी घेतली आहे.त्यामुळे त्यांचे नावलौकिक झाले आहे. याचाच कार्यभाग म्हणून ते अध्यक्षपदावर रुजू झाले आहेत.
कडोली ग्रामपंचायत तशी मोठी आहे. मात्र सागर पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी केलेले कार्य वाखण्याजोगी आहे. परिणामी गरिबांना मदत करत स्वतःची व आपल्या समर्थकांची प्रगती करण्यासाठी त्यांची धडपड असते. यामुळेच त्यांनी हा टप्पा गाठला आहे. त्यांच्याशी याबाबत विचारले असता कडोली भागातील गोरगरीब जनतेसाठी मी कायमस्वरूपी सक्षम आहे. विकासाची गंगा कडोलीमध्ये उतरवून गोरगरीब जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी सज्ज झालो आहे. त्यामुळे कोणत्याही अडचणी असतील त्या नियमात बसवून व कायदेशीर करून नागरिकांना मदत करण्यासाठी मी वाटचाल करत आहे.
नागरिकांचा आशीर्वादच या सर्व गोष्टींकडे मला नेत आहे. त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यामुळेच आतापर्यंत माझी ही खडतर प्रवासाची वाट सुकर झाली आहे. मी वैयक्तिक सागर पाटील या नावाने नसून कडोली ग्रामस्थांचा प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे आणि अशीच मदत कडोलीकरांनी कायमस्वरूपी मला करावी. विकासाच्या दृष्टिकोनातून जे काय पाऊल उचलले आहे ते मला सहजपणे घडावे. कडोलीकरांचा आशीर्वाद हेच माझे ध्येय आहे आणि माझा खडतर प्रवासी आहे.