Thursday, May 2, 2024

/

ग्रामीण भाजपकडून हेस्कॉमला घेराव

 belgaum

बेळगाव लाईव्ह : शुक्रवारी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव ग्रामीण भाजप कडून पंत बाळेकुंद्री येथील हेस्कॉम कार्यालयाला घेराव घालण्यात आला आणि बेळगाव बागलकोट रोडवर दीड तास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते.

पावसाने दडी दिल्यामुळे शेतामध्ये पिके वाळून जात आहेत विहिरीमध्ये व बोरवेल मध्ये पाणी आहे पण शेतकऱ्याला शेतामध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी मर्यादित वीज उपलब्ध होईना त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट निर्माण झाले आहे अश्या परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप करण्यात आला

राज्यसभा सदस्य व भाजपा कर्नाटक राज्य रयत मोर्चा अध्यक्ष इराणा कडाडी यांनी शेतकऱ्याला केंद्र सरकारकडून रू. 6000 तसेच भाजपा राज्य सरकारकडून रू. 4000 असे एकूण रक्कम रु. 10000 किसान सन्मान निधीच्या माध्यमातून मिळत होते, काँग्रेस सरकारने सत्तेत आल्या नंतर रू. 4000 निधी बंद केलाआहे.

 belgaum

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी राखीव ठेवलेल्या विद्यानिधी 560 कोटीचा निधी देखील बंद केलेला आहे याशिवाय कर्नाटकातील किसान कार्डधारक 50 लाख शेतकऱ्यांना मिळणारे प्रत्येकी रु.10000 अनुदान बंद केलेले आहेत, अशा अनेक उपयोगी योजना बंद करून काँग्रेस सरकारने कर्नाटकातील सर्व शेतकरी बंधूंवर अन्याय केलेला आहे.

शेतकऱ्यांना सध्या दिवसात किमान 7 तास विद्युत पुरवठा झालाच पाहिजे मात्र सरकारकडून तो पुरवला जात नाही तात्काळ विद्युत पुरवठा करावा अशी मागणी इराणा कडाडी यांनी केली.Bjp

भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव यांनी खडीमशीन वाल्यांना 24 तास वीज पुरवठा केला जातो पण देशाचा अन्नदाता शेतकरी याच्याकडे मात्र साफ दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप करत कर्नाटक राज्य सरकार झोपा मारत आहे अशी बोचरी टीका देखील केली.

उद्यापासून नेहमी दिवसा 7 तास विद्युत पुरवठा न झाल्यास बेळगाव बंद सारखे उग्र आंदोलन हाती घेतले जाईल याची सरकारने नोंद घ्यावी असा इशारा देखील त्यांनी दिला.
या कार्यक्रमाला बेळगाव ते बागलकोट रस्त्यावर बसून शेकडो शेतकऱ्यांनी किमान दीड तास रस्ता रोको आंदोलन केले तसेच सरकार विरोधी घोषणा दिल्या.

सर्व शेतकरी बैलगाड्या चाबूक आणि ट्रॅक्टर घेऊन आंदोलनाला पोचले होते, या आंदोलनाला युवराज जाधव, शंकर मल्लन्नवर, मलिकार्जून माद्दन्नावर, तिप्पाजी मोरे, भरमा गोमान्नाचे, शहाजी जाधव, पंकज घाडी, प्रदीप सन्नीकोप्प, शशीमाऊली कुलकर्णी, नारायण पाटील आदींसह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते, याप्रसंगी हेस्कॉमचे अधिकारी उपस्थित होते, त्यांनी निवेदन स्वीकारून शनिवारीपासून दिवसा 7 तास विद्युत पुरवठा करण्याचे आश्वासन दिले, याप्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.