बेळगाव लाईव्ह :बेळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेमध्ये सापडलेला तब्बल 22 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन रेल्वे पोलिसांनी संबंधित प्रवाशाला परत करून त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवल्याची घटना घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की नेहमीप्रमाणे बेळगाव रेल्वे स्थानकावर गस्ती भरणाऱ्या रेल्वे पोलिसांना रेल्वे क्र. 20653 मध्ये ऑप्पो कंपनीचा 20,000 रुपये किमतीचा मोबाईल सापडला.
तेव्हा तात्काळ चौकशी करून तसेच ओळख पटवून तो मोबाईल बेळगाव रेल्वे सुरक्षा दल ठाण्याच्या ठिकाणी संबंधित महिला प्रवाशाकडे सुखरूप सुपूर्द करण्यात आला.
हरवलेला आपला महागडा मोबाईल परत मिळाल्याने आनंदित झालेल्या त्या महिलेने कृतज्ञता व्यक्त करून रेल्वे पोलिसांचे आभार मानले.