बेळगाव लाईव्ह: पहिला बुडा आणि आत्ता महापालिका दोघांनीही दुर्लक्ष केल्याने संतप्त रहिवाश्यांनी रस्ता रोको आंदोलन करत बेळगाव मनपाचा पुतळा दहन केला.
बेळगाव महापालिकेचा भाग असलेल्या आणि बुडा येथून ११ क्रमांकाच्या योजनेत येणाऱ्या बसवन कुडची येथील देवराज अर्स कॉलनी या भागाकडे महापालिकेने व बुडाने दुर्लक्ष केल्याने चिडलेल्या रहिवाशांनी रस्ता रोको करून आंदोलन केले मनपाच्या प्रतिकात्मक आणि पुतळयाचे दहन केले . या भागात बुडाची पहिली योजना राबवली होती मात्र त्याकडे व्यवस्थित लक्ष न दिल्याने चिडलेल्या लोकांनी रविवारी आंदोलन हाती घेतले होते.
हा परिसर मनपा व्याप्तीत येऊन अनेक वर्षे उलटली आहेत या भागाचा आतापर्यंत महानगरपालिका कर वसूल करते मात्र त्यानुसार देवराज अर्स कॉलनीत म्हणावा तितका योग्य विकास झालेला नाही योग्य रस्ते नाहीत.
या वस्तीच्या स्थापनेपासून गटार बांधण्यात आलेली नाहीत.सर्वसाधारणपणे याठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. ही बाब 35 वर्षांपासून पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आली बेळगावातील येथील एकाही आयुक्तांनी तसेंच महापौरानी या ठिकाणी भेट दिली नाही कोणतीही विकासकामेही झालेली नाहीत असा आरोप यावेळी करण्यात आला.
रविवार सकाळी 9 वाजता स्थानिक संघटना व महिला नागरिकांनी एकत्रित येऊन महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली अन् पुतळ्याचे दहन केले. यावेळी देवराज अर्स कॉलनी वेल्फेअर सोसायटीने 15 दिवसात देवराज अर्स कॉलनीच्या समस्यांवर महापालिकेने प्रतिसाद न दिल्यास बेळगाव व बागलकोट राज्य महामार्गावर येऊन आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
यावेळी महेश हिरेमठ, वकील यल्लाप्पा दिवटे, डॉ जगत शंकरगौडा, बसवराज सुनगार, चंद्रशेखर कंम्मार, विठ्ठल तीमनाळ,सुनील नरेर, शिवू उप्पार, मंजू कमार, बी ए बोरन्नावर महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.