belgaum

11 सप्टेंबरला मिळणार मार्कंडेयचे नवे अध्यक्ष, उपाध्यक्ष

0
44
Markandey shugar
 belgaum

बेळगाव लाईव्ह:गेल्या आठवड्यात चुरशीने झालेल्या मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे कारखान्याला नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळणार आहे.

कारखान्यावर शेतकरी बचाव पॅनेलची सत्ता आली असल्यामुळे नूतन संचालक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणार आहेत. निवडणुकीत उपाध्यक्ष तानाजी पाटील आणि संचालक आर. आय. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी बचाव पॅनेलने पंधरा पैकी दहा जागांवर विजय मिळवला.

आता कारखान्याला नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष लाभणार आहेत. या निवडीबाबत लोकांत उत्सुकता असून अखेर 11 सप्टेंबर रोजी अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवड होणार आहे. सहकार खात्याकडून कारखान्याला याबाबत पत्र मिळाले आहे. त्यामुळे 11 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे.

अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी काही तगडे उमेदवार रिंगणात असल्याची चर्चा आहे. पॅनलचे कोणावर एकमत होते, त्यावर कारखान्याचा नवा अध्यक्ष, उपाध्यक्ष ठरणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.