बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराचे नवीन पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. शहराचे मावळते कायदा सुव्यवस्था विभागाचे डीसीपी टी शेखर यांनी त्यांना आपला पदभार सोपविला.
बेळगाव शहर कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नूतन पोलीस उपायुक्त म्हणून 2019 बॅचचे आय पी एस अधिकारी रोहन जगदीश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारकडून पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश तीन दिवसापूर्वी बजावण्यात आला होता त्यामध्ये बेळगावचे पोलीस उपायुक्त कायदा व सुव्यवस्था शेखर एच. टेक्कण्णावर यांचा समावेश आहे.
कर्नाटक राज्य गृह खात्याने उपायुक्त शेखर यांची अन्यत्र बदली करून त्यांच्या जागेवर आयपीएस अधिकारी (केएन -2019) रोहन जगदीश यांची नेमणूक केली आहे.
रोहन जगदीश यांच्या रूपाने बेळगाव शहराचा कायदा व्यवस्था विभाग रोहन जगदीश सांभाळणार आहेत आगामी गणेशोत्सवात त्यांच्यावरच बंदोबस्ताची मोठी जबाबदारी असणार आहे.