बेळगाव लाईव्ह : लाडक्या बाप्पाचा लळा सर्वांनाच असतो. अशाच प्रकारे मुस्लीम समाजातील एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या ठाण्यात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून एकोपा जोपासला आहे.
माळमारुती पोलीस ठाण्याचे सीपीआय झाकीर पाशा(जे एम) कालीमिरची यांनी स्वत: हिंदू परंपरेनुसार गणेशमूर्ती आणली. गणवेशात त्यांनी कपाळाला टिळा लावला, डोक्यावर भगवी गोपी आणि भगवी शाल घातली, गणेशमूर्ती अनवाणी आणली, गणेशमूर्ती पोलीस ठाण्यात बसवली, पूजा केली. कर्मचार्यांसह गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला.
हा अधिकारी जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन हिंदूंसोबत गणेशोत्सव साजरा करून इतर अधिकाऱ्यांसाठी आदर्श तयार करत आहे. या पोलीस अधिकाऱ्याच्या कृतीचे कौतुक होत आहे.
याआधी सहा वर्षापूर्वी ते एपीएमसी पोलीस ठाण्यात सेवा बजावत असतानाही त्यांनी गणेशोत्सवादरम्यान पोलीस ठाण्यात गणेशमूर्तीची स्थापना केली होती आता पुन्हा त्यांनी माळ मारुती पोलीस स्थानकात गणेश मूर्तीचे पूजन करून सामाजिक एकोपा दाखवला आहे.
बेळगावात पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी आणि जे एम कालीमिरची यांच्या सारखे अधिकारी सामाजिक एकोपा राखण्यासाठी जाती धर्मा पलीकडची बांधिलकी जपत असतात अश्या अधिकाऱ्यांच्या कार्याचे कौतुक झालेच पाहिजे.
चार वर्षापूर्वी पोलीस निरीक्षक कालीमिरची यांनी जपलेली सामाजिक बांधिलकी