बेळगाव लाईव्ह :मराठा समाज सुधारणा मंडळ यंदा शंभर वर्षे पूर्ण करत आहे त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत देण्यात आली आहे.
यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिवराज पाटील, सरचिटणीस जी.जी.कानडीकर, खजिनदार के.एल. मजूकर व सहचिटणीस संग्राम गोडसे होते.
यावेळी समाजातील युवकांनी सांस्कृतिक व सामाजिक कार्याबरोबरच शिक्षणाला अधिक महत्त्व द्यावे. मराठा समाजातील अनेक जुन्या रूढी,परंपरा हळूहळू बदलू लागल्या आहेत याबद्दल समाधान व्यक्त केले.
मंडळाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन करण्याबरोबरच स्मरणिका प्रसिद्ध करणे, समाजातील सर्वच क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी बजावून समाजाला दिलेले योगदान लक्षात घेऊन अशा व्यक्तीचा सन्मान करणे, शैक्षणिक निधी उभारणे व अन्य उपक्रम राबविण्यात येणार आहेत अशीही माहिती श्री. मरगाळे यांनी यावेळी दिली.
प्रारंभी दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले तर संग्राम गोडसे यांनी मागील वर्षाचे इतिवृत वाचून त्याला मंजुरी घेतली. सन 2021-22 चा जमाखर्च के. एल .मजूकर यांनी मांडून त्याला मंजुरी घेतली. 2022-23 सालासाठी अनिल मंडोळकर यांची लेखापरीक्षक ( सी.ए.) तर सहाय्यक म्हणून सुनिल आनंदाचे यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली.
यावेळी राजेंद्र मुतगेकर, उमेश पाटील यांनी उपयुक्त सुचना केल्या.तर मोहन कंग्रालकर, अजित यादव, विनोद आंबेवाडीकर, आय.जी.मुचंडी, महादेव चौगुले, प्रदीप चव्हाण यांनी विविध ठरावाना सूचक व अनुमोदन दिले. जी.जी.कानडीकर यांनी आभार मानले.
सर्वसाधारण सभेस रघुनाथ बाडगी, मोहन सप्रे, राजू पावले, ईश्वर लगाडे, एस.ओ.जाधव, दत्तात्रय जाधव, प्रकाश गडकरी या कार्यकारिणी सदस्यांसह नीता पाटील, सई पाटील,रामचंद्र ठोंबरे, अशोक हलगेकर, गणेश दड्डीकर, संदीप मुतगेकर, बाबू कोले, श्रीधर खन्नूकर, सतिश देसाई, प्रदीप शट्टीबाचे, रणजित हावलाण्णाचे, पांडुरंग पट्टण, शेखर पाटील यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.