बेळगाव लाईव्ह :काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यासाठी मोठ्या चुरशीने निवडणूक पार पडली. या निवडणुकीत तानाजी पाटील आणि आर आय पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनलने मोठा विजय मिळविला आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत चर्चा सुरू झाल्या असून सहकार खाते याबाबत कधी निर्णय घेणार याकडे लक्ष लागून आहे.
मार्कंडेय सहकारी कारखाना सहकार खात्याच्या सूचनानुसार चालतो. त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर अध्यक्षांनी उपाध्यक्षांच्या निवडीबाबत सहकार खात्याच्या उपनिबंधकांना निर्णय घ्यावा लागतो. कारखान्यासाठी रविवारी मतदान आणि निकाल जाहीर झाला. पण अद्याप अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीबाबत सहकार खात्याने कोणताही आदेश काढलेला नाही.
निवडून आलेल्या संचालकातून आणि वरिष्ठ नेते अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी रणनीती आखण्यात येत आहे. आता सहकार खात्याने सूचना केल्या नंतर या कामाला गती येणार आहे.
सहकार खात्याने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर निवडणूक प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे. सहकार खात्याच्या सूचनेनंतर सात दिवसांच्या आत दीक्षा आणि उपाध्यक्ष निवडने आवश्यक असते. त्यामुळे आपण उपनिबंधक कधी आदेश करतात याकडेच विद्यमान संचालक आणि सभासदांचे लक्ष लागून आहे.
लवकरच कारखान्याच्या गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे त्याची तयारी करण्यासाठी अध्यक्ष उपाध्यक्ष निवड होणे गरजेचे आहे. ऊसतोड टोळ्या तयार करणे, ऊस पुरवठा करण्यासाठी लोकांना भेटने, कारखान्यातील इतर दुरुस्ती कामाबाबत निर्णय घेणे यासाठी लवकरात लवकर कार्यकारिणी मंडळ स्थापन करण्याची गरज आहे त्यासाठी सहकार खात्याच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.