बेळगाव लाईव्ह:ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांवर लोडशेडिंग अर्थात भारनियमनाचे संकट वाढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्यात येत्या दहा दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास कांही प्रमाणात लोडशेडिंग केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
यावर्षी पावसाळा उशिरा सुरू होण्याबरोबरच राज्यात बहुतांश ठिकाणी कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जलाशयांमधील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे.
येत्या काळात पावसाची स्थिती अशीच राहिल्यास गंभीर परिस्थिती ओढवणार असल्यामुळे सरकारने जलाशयातील पाण्याचा वापर जपून करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळेच पुढील 10 दिवसात राज्यात पावसाने चांगली हजेरी लावली नाही तर लोडशेडिंग अर्थात भारनियमन केले जाणार आहे.
सध्या सरकारकडून लोडशेडिंग केले जात नसले तरी वीज पुरवठ्यावर परिणाम झाल्याने ग्रामीण भागात दिवसातून अनेकदा वीज पुरवठा खंडित केला जात आहे.
सरकारने दहा दिवसानंतर भारनियमन केले जाण्याची शक्यता वर्तविल्यामुळे या सप्टेंबरपासूनच नागरिकांना लोड शेडिंगला सामोरे जावे लागणार आहे.
रविवारचे बेळगाव शहरातील लोड शेडींग
पॉवर आउटेज
F-1 इंदल,
F-4 वैभव नगर F-5 शिवबसव नगर, F-8 शिवाजी नगर F-9 सदाशिव नगर F-10 जिनाबाकुल F-11 सिव्हिल हॉस्पिटल F-14 सुभास नगर F-15 विश्वेश्वरय्या नगर F-16 KPTCL ऑफिस 33 KV KLE फीडर UK २७
कुमारस्वामी लेआउट
F-2 हनुमान नगर F-3 सह्याद्री नगर, F-4 पाणी पुरवठा 110 KV कणबर्गी फीडर 33KV श्री नगर फीडर श्री नगर अंजनेय नगर महांतेश नगर अशोक नगर चेन्नम्मा सर्कल
रविवार 10.09.2023 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी