बेळगाव लाईव्ह :बेळगाव लाईव्ह :खानापूर रोड ओलांडताना पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत वृध्द महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना उद्यमबाग येथे शनिवारी दुपारी सव्वा दोन वाजताच्या दरम्यान घडली आहे.
जैरूनबी मोहम्मदसाब चौधरी वय 74 असे या महिलेचे नाव असून ती राजाराम नगर उद्यमबाग येथे राहणारी आहे. दुकानाला जाण्यासाठी रस्ता ओलांडताना बेमको आणि मजगाव क्रॉसच्या मधोमध हा अपघात झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाण्याची टँकर बेळगाव कडून मजगाव कडे जात होती त्यावेळी सदर मयत महिला खानापूर रोड वर पश्चिमे कडून पूर्वे कडे दुभाजकावरून रस्ता ओलांडत होती त्यावेळी टँकरने दिलेल्या धडकेत तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.
अपघात होताच रहदारी दक्षिण पोलिसांनी धाव घेतली यावेळी ट्रॅफिक जाम देखील झाली होती. रहदारी दक्षिण पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला आहे.
बेळगाव खानापूर रोडवर मोठ्या प्रमाणात रहदारी असते त्यामुळे रस्ता ओलांडताना काळजी घेण्याची गरज आहे.