Thursday, December 26, 2024

/

गवळी गल्लीतील ‘या’ मंडळाचा ‘हा’ नवा उपक्रम

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सावरकर युवक मंडळ गवळी गल्ली बेळगावतर्फे यंदा श्री गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेशोत्सव काळात सलग पाच दिवस प्रसाद वाटप करण्याचा नवा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सर्वसामान्यपणे श्री गणेशोत्सव काळात कांही मंडळांकडून ठराविक मुहूर्तांवर श्री गण होम आणि त्यानंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.

तथापि गवळी गल्ली बेळगाव येथील वीर सावरकर युवक मंडळातर्फे गेल्या शनिवारी दि. 23 ते आज बुधवारी 27 सप्टेंबरपर्यंत म्हणजे सलग पाच दिवस सार्वजनिक श्री गणेश मंडपाच्या ठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येत आहे.Gavali Galli

दररोज मोठ्या प्रमाणात गणेश भक्त या प्रसादाचा लाभ घेत असतात. उपरोक्त मंडळाच्या या नवीन आणि चांगल्या उपक्रमाबाबत आजूबाजूतील परिसरातील नागरिक आणि बाहेरून येणारे गणेश भक्त समाधान व्यक्त करून उपक्रमाचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.