बेळगाव लाईव्ह: जंगलतोड झाल्याने वन्यजीवींच्या ओढ मानवस्तीकडे अर्थात शहरांकडे वाढत चाललेला आहे गेल्या दीड दोन वर्षांमध्ये अनेक वन्यजीवी बेळगाव शहरात च्या हद्दीत दाखल झालेल्या घटना आपण पाहिलेल्या आहेत.
गेल्या आठवड्यात शास्त्रीनगर भागात धुमाकूळ घातलेला कोल्ह्याची घटना ताजी असताना रविवारी रात्री शाहूनगर भागात कोल्ह्याने धुमाकूळ घातला असून एकाला जावा घेऊन जखमी किरकोळ जखमी केल्याची घटना देखील घडली आहे. शिवाजीनगर भागात आलेल्या कोल्ह्याची दृश्य सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद झाले आहेत. या संदर्भात वन खात्याला कल्पना देण्यात आली असून सदर कोल्ह्याला पकडण्याची तयारी वनखात्याने चालवलेली आहे.
वन्य जीवी मानवी वस्तीकडे का वळतात त्याची कारणे शोधून काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. एकतर जंगल तोड दुसरे कारण म्हणजे जंगलात त्यांना पाणी आणि शिकार मिळत नसल्याने अन्नाच्या शोधत मानवी वस्तीकडे वळत असतात.
मागील वर्षी बेळगावात बिबट्याने धुमाकूळ घातला होता रेस कोर्स मध्ये बिबट्या ठाण मांडून बसला होता यासाठी शाळांना सुट्टी देखील देण्यात आली होती त्या घटने नंतर मागील आठवड्यात शास्त्री नगर भागात कोल्हा दिसला होता त्याने एकाला चावा घेऊन जखमी देखील केले होते त्यांना वन खात्याने पकडुन पुन्हा जंगलात सोडून दिले होते.
रविवारी रात्री शिवाजी नगर पेट्रोल पंप जवळील पाचव्या गल्लीत कोल्हा दिसला अन सी सी टी व्हीत देखील कैद झाला आहे.शिवाजी नगर भागातील एका युवकाला चावा देखील घेतल्याची माहिती मिळत आहे वन खात्याने याकडे लक्ष देऊन कोल्ह्याला पकडुन जंगलात सोडून द्यावे अशी मागणी या निमित्ताने वाढू लागली आहे.