बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील रस्त्यावर लवकरच परिवहन मंडळाच्या इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. वायव्य परिवहन महामंडळाकडून बेळगाव शहराला डिसेंबर अखेरपर्यंत ५९ इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार आहे. या डिझेलवर आधारित 50 बसेस ग्रामीण भागाला उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने शहर आणि ग्रामीण सेवेत सुधारणा होणार आहे.
परिवहन मंडळाच्या बेळगाव विभागाने इलेक्ट्रिक बसेस चार्जिंगसाठी पाच फास्ट चार्जिंग केंद्र सुरू करण्याची विशेष योजना आखली आहे. यासह शहरात आणखी एक नवे बसस्थानक देखील निर्माण केली जाणार आहे त्यामुळे बेळगावच्या बस सेवेला अच्छे दिन येणार आहेत.
सध्या बेळगाव शहरात सीबीटी येथून रोज सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत १४० बसेस धावतात. ज्यातून रोज सरासरी ८० हजार ते १ लाख प्रवासी प्रवास करतात. परिवहन मंडळाला आर्थिक तोट्यामुळे नव्याने बस खरेदी करता आलेल्या नाहीत.
प्रवाशांच्या संख्येनुसार बेळगाव शहराला आणखी १०० ते १५० बसेसची आवश्यकता आहे. त्यासाठी परिवहन मंडळाने ५० इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून ऑगस्ट महिन्यातच सरकारला याबाबतचा प्रस्ताव पाठवून देण्यात आला आहे.
इलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्यास इंधनाचा खर्च देखील कमी होणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासूनच नव्या बसेस चा ताफा बेळगाव साठी दाखल होणार असून डिसेंबर अखेरपर्यंत ५० बसे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर बसेस २५० ते ३०० किलोमीटर धावतील.
२ ते ३ तासात बस पूर्ण चार्ज होईल यासाठी विशेष चार्जिंग पॉईंट बसवले जाणार आहेत. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, पॅनिक बटण, अग्निशमन उपकरणे, प्रथमोपचार किट, ग्लास हॅमर आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
बेळगाव शहराला या बस जे-नर्म योजनेतून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र आता या बसेसची देखील व्यवस्था झाली आहे. त्यातच अपुऱ्या संख्येमुळे वायव्य परिवहन महामंडळाने बंगळूर महानगर ट्रान्सपोर्ट निगमकडून (बीएमटीसी) नऊ लाख किलोमीटर धावलेल्या जुन्या बंधारात करणाऱ्या बसेस खरेदी करत त्या बेळगावसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.
मात्र यापैकी बहुतेक बसेस रस्त्यावरच नादुरुस्त होऊन थांबत आहेत. जर बेळगावच्या ताफ्यात नवीन बसेस दाखल झाल्यास परिवहन वाहतुकीत सुधारणा होणार आहे.