Sunday, December 22, 2024

/

नगरसेवक करणार इंदोरचा अभ्यासदौरा आणि मुस्लिम बांधवांचे अभिनंदन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सर्व नगरसेवकांसाठी इंदोर येथे पाहणी दौरा आयोजित करण्यात आला असून महापालिका सर्वसाधारण सभेत त्याला संमती देण्यात आली. इंदोरमध्ये झालेल्या विकास कामांचा अभ्यास करून तो बेळगावातही राबवण्याच्या उद्देशाने हा दौरा असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

महापालिका सर्वसाधारण सभेत या दौर्‍याबाबत चर्चा करण्यात आली. गेल्या चार महिन्यांपासून या दौर्‍याची चर्चा होती. अखेर या दौर्‍याला मंजुरी देण्यात आली आहे. या सर्वसाधारण सभेत शहरातील सर्व स्मशानभूमींची पाहणी करून विकास कामे राबवणे, नव्याने शववाहिका खरेदी करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बेळगाव महापालिकेच्या मागील सभागृहात नगरसेवकांनी शिमला दौरा केला होता विविध कारणाने तो दौरा गाजला होता आता या मनपाच्या कार्यकाळात नगरसेवक इंदोरला जाणार आहेत आणि इंदोर च्या स्मार्ट सिटी चे काम कशा पद्धतीने झालेला आहे इंदोरचा विकास कसा झालेला आहे याचा अभ्यास करणार आहेत.

महापालिकेत मुस्लिम बांधवांचे अभिनंदन

गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद दोन्ही सण एकत्र आले आहेत. पण, मुस्लिम बांधवांनी ईदची मिरवणूक दोन दिवस लांबणीवर टाकून आदर्श निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्व मुस्लिम बांधवांचे अभिनंदनाचा ठराव महापालिका सभागृहात करण्यात आला.

City corporation bgm
मध्यवर्ती गणेश महामंडळ आणि शहर देवस्थान समितीच्या वतीने देखील मुस्लिम बांधवांचे ईद-ए-मिलादची मिरवणूक दोन दिवस पुढे ढकलल्यामुळे अभिनंदन करण्यात आले होते आज महापालिकेत अभिनंदन झाले.

महापालिका सर्वसाधारण सभेत ईदच्या मिरवणुकीबाबत महापौर शोभा सोमनाचे यांनी मुस्लिम बांधकांच्या निर्णयाचे कौतुक केले. यावेळी विरोधी गटनेते मुजम्मील डोणी यांनी शरियत, समाजातील मान्यवर आणि आमदार राजू सेट यांनी एकत्रित बैठक घेऊन ईदची मिरवणूक दोन दिवस लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. गणेशोत्सव आणि ईद हे दोन्ही सण तीस वर्षांनंतर एकाच वेळी आले आहेत. दोन्ही समाजाला हे सण चांगल्या पध्दतीने साजरे करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, असे सांगितले. सभागृहात या निर्णयाचे कौतुक करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.