बेळगाव लाईव्ह: रियल इस्टेट व्यावसायिकाचे अपहरण करून पैश्याची मागणी करणाऱ्या कुख्यात गुंडाला अटक केल्याची कारवाई कॅम्प आणि सी सी बी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून केली आहे.
विशाल सिंह विजय सिंह चव्हाण वय 25 रा. शास्त्रीनगर बेळगाव असे या कुख्यात गुंडाचे नाव आहे.या बाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहितीनुसार 1 जून 2023 रोजी प्लॉट दाखवतो असा भरोसा देऊन एका रियल इस्टेट व्यावसायिकाचा त्याचाच कार मधून अपहरण करण्यात आले होते या संदर्भात टिळकवाडी पोलिसात अपहरण करणे, जीवाला धोका देणे पैश्याची मागणी करणे फिर्यादीची गाडी हिसकावून घेणे असा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आले होते त्यात कॅम्प पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला आणि सी सी बी पोलीस निरीक्षक नंदेश्वर कुंबार यांचा समावेश होता सदर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास लावताना अपहरण करणाऱ्या गुन्हेगाराची ओळख पटवत अटकेची कारवाई केली आहे .
पोलिसांनी आरोपीकडून अपहरण प्रकरणी वापरलेली हत्त्यारे जप्त केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.सदर आरोपीने गोव्यातील म्हापसा अंजना बीचोली आणि साखळी भागात चोरी केल्याची कबुली देखील पोलीस तपासात दिली आहे .यापूर्वीही एकूण 10 गुन्हे दाखल असून त्याची चौकशी तपास सुरू आहे.
आरोपीला पकडण्यात आलेले विशेष टीम पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला, नंदिश्र्वर कुंबार आदी सहकाऱ्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.
कॅम्प पोलिसांकडून दुचाकी चोरटा अटकेत :बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरातील कॅम्प पोलिसांनी एका दुचाकी चोराला अटक करून त्याच्या जवळील एक लाख 35 हजार किंमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. सैफिल काझिम तहसीलदार वय 35 रा. उज्वल नगर बेळगाव असे आरोपीचे नाव आहे.
कॅम्प पोलिसांनी याला अटक करून तपास केला असता घटप्रभा रेल्वे स्थानक एक, निपाणी शासकीय इस्पितळ एक चिकोडी इस्पितळ एक आणि बेळगाव के एल ई इस्पितळ दोन अश्या एक लाख पस्तीस हजार किंमतीच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.कॅम्प पोलीस निरीक्षक अल्ताफ मुल्ला आदी सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
एपीएमसी पोलिसांकडून चोरट्या कडून अडीच लाखांचे दागिने जप्त
बेळगाव लाईव्ह:1 ऑगस्ट रोजी एपीएमसी पोलीस स्थानक हद्दीतील रघुनाथ पाटील यांच्या घरातील दागिने चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानुसार पोलिसांनी तपास करून अब्दुल गणी शेख वय 24 रा. मुस्लिम गल्ली अनगोळ याला अटक करून त्याच्या जवळील दीड लाख किंमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत .आरोपीने पोलीस तपासात अन्य दोन ठिकाणी चोरी केल्याचे कबूल केले आहे