बेळगाव लाईव्ह :आपल्या कार्यक्षेत्रात समाविष्ट केलेल्या 28 गावातील 21 ग्रामपंचायतींना बुडाने नोटीस बजावून मास्टर प्लॅन बाबत कल्पना दिली आहे. या गावात कोणत्याही प्रकारे बेकायदा लेआउट होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
बुडाने बेळगाव तालुक्यातील 28 ग्रामपंचायत कार्यक्षेत्र आपल्या अखत्यारित घेतले आहे. या निर्णयावर अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. दोन दिवसापूर्वी काही लोकप्रतिनिधींनी बुडा आयुक्तांची भेट घेत हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप केला होता.
ग्रामपंचायत येथील लोकांना विश्वासात न घेता हा निर्णय परस्पर घेण्यात आला आहे महापालिकेच्या सभोवताली सहा किलोमीटर क्षेत्र बुडाच्या अखत्यारित येऊ शकते. पण बुडाणे मनमानी करत तब्बल 13 किलोमीटर यांची अंतर आपल्या अखत्यारीत घेतले आहे. असा आरोप करण्यात आला होता.
बुडा कार्यक्षेत्रात 28 गावांचा समावेश झाल्यामुळे या गावात कोणत्याही प्रकारे लेआउट घालताना बुडाची मंजुरी असणे आवश्यक असणार आहे. त्यासाठी 28 गावात नव्याने मास्टर प्लॅन राबविण्यात येणार आहे. त्यामुळे बुडा आयुक्तानी पीडीओना पत्र पाठवले असून मास्टर प्लॅन आणि लेआउट संदर्भात विविध सूचना केल्या आहेत.
एकीकडे बुडा 28 गावात आपले कार्यक्षेत्र वाढवत असताना दुसरीकडे काही प्रमाणात विरोध होत असल्यामुळे यावर कोणता निर्णय होणार याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.