Tuesday, January 7, 2025

/

आंध्र मधील अपघातात पाच ठार

 belgaum

बेळगाव लाईव्ह: आंध्र प्रदेश येथील केव्हीपल्ली तालुक्यातील मथमपल्ली येथे झालेल्या भीषण वाहन अपघातात तिरुपतीला निघालेल्या पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर 11 जण जखमी झाले असून सर्व रहिवासी बेळगाव जिल्ह्यातील आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील असलेले भाविक क्रूझर वाहनातून तिरुपतीला निघाले होते. थिंपप्पाचे दर्शन घेऊन सर्व जण आपल्या मूळ गावी परतत होते. आज पहाटे 3.30 च्या सुमारास मथमपल्ली गावाजवळ हा अपघात झाला. क्रुझर वाहनातून लहान मुले आणि महिलांसह 16 जण प्रवास करत होते आणि पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात होताच स्थानिकांनी बचावकार्य करत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनात अडकलेले मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.

हणमंतू (38), हणमंत (ड्रायव्हर, 42), अंबिका (14), शोभा (36) आणि मानंदा (32) अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये शोभा आणि अंबिका या आई आणि मुलीचा समावेश आहे.

कस्तुरी, मेघा, शिवानंद, बसप्पा, मल्लाप्पा, अक्षिता, उदय, सुनंदा, महेश, साक्षी आणि बसवराज यांच्यासह एकूण 11 जण जखमी झाले.
स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. जखमींवर रुया रुग्णालयात उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.