बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहर तसेच तालुक्यात मोठ्या भक्ती भवानी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. प्रशासनाबरोबरच आता मंडळेही कामाला लागली आहेत. त्यामुळे अवघ्या चाळीस दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी शहर परिसरात सुरू झाली आहे. अनेक मंडळे आतापासूनच तयारी करत असून मूर्तीला साजेल असे आरास,अहवाल छपाई नवीन कार्यकारिणीची निवड आणि सजावट करण्यासाठी त्यांची धडपड सुरू झाली आहे.
बेळगाव मध्ये पारंपारिक पद्धतीने गणेश उत्सव साजरा केला जातो. यावर्षी मोठ्या थाटात माठात गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. प्रशासनाने गणेशोत्सवाला अडथळा येणार नाही यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचबरोबर आता मंडळीही गणरायांच्या आगमनासाठी सज्ज झाले आहेत.
मूर्तिकार ही आपल्या कामात गुंतले आहेत. शेवटच्या महिन्याभरातच गणेशोत्सव येऊन ठेपल्याने मोठी लगबग सुरू झाली आहे. बेळगाव शहर आणि गणेशोत्सव यांचे नाते अतूट आहे. त्यामुळे दोन महिन्यापासूनच आधी गणेशोत्सवाच्या तयारीला अनेक जण लागतात.
मंडप उभारणी देखावा आरास याचबरोबर विशेष करून विद्युत रोषणाईवर अधिक तर भर दिला जातो. कशा प्रकारची विद्युत रोषणाई असेल त्याला साजेल असा मंडप उभा करून भाविकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आता अनेकांनी धडपड सुरू केली आहे. अनेक मंडळे चशी व इतर साहित्य जमा करण्यासाठी धडपडत आहेत.
शहर परिसरात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्यात येत असल्याने त्याची तयारी ही मोठ्या जल्लोषी वातावरणात करण्यात येत आहे. सध्या शहर आणि परिसरात गणरायांच्या आगमनाचे वेध लागले असून अनेक मंडळे कामालाही लागले आहेत.
बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सव आयोजनाची बैठक घेतली होती त्या बैठकीत अधिकाऱ्यांना रस्ते दुरुस्ती हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना मिरवणूक मार्गात खाली लोंबकळनाऱ्या तारा बाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार हेस्कॉमचे अधिकारी अनेक गणेश मंडळांची संपर्क साधून गल्लीतील अडथळे दूर करत आहेत.