बेळगाव लाईव्ह : हेस्कॉम कडुन विद्युत वितरणाच्या हलगर्जीपणामुळे बेळगाव तालुक्यातल्या बिजगर्णी गावातल्या तरुण शेतकरी पती-पत्नीचा बळी गेला आहे.
शेतात काम करत असताना विद्युत तार अचानक अंगावर पडल्याने शॉक लागून या शेतकरी दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही घटना घडल्याने या परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अमित उर्फ (निसार महमद) मकबूलसाब सनदी उर्फ देसाई वय 32, लता निसार उर्फ (अमित) उर्फ देसाई वय 26 दोघेही रा. बिजगर्णी असे या दांपत्याचे नाव आहे. त्यांच्या पश्चात एक लहान मुलगी आहे. सदर दांपत्य रविवारी सकाळी शेतात रताळ्याना औषध फवारणी मारत होते.
त्यावेळी अचानक विद्युत खांब्यावरची तार तुटली आणि निसार यांच्या अंगावर पडली त्यात निसार यांचा मृत्यू झाला निसार यांना वाचवायला गेलेल्या त्यांच्या पत्नीलाही शॉक लागला त्यात दोघांना जीव गेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शेतातून जाणार्या 11 केव्ही व्होल्टच्या विजेच्या तारा अनेक वर्षापासून असून गंजलेल्या आहेत. त्या तारा तातडीने बदला अशी मागणी गावकर्यांनी वेळोवेळी केली होती.
मात्र हेस्कॉमने याकडे दुर्लक्ष केले होते अश्या अनेक तारा बेळगावच्या ग्रामीण भागात अजूनही धोकादायक स्थितीत आहेत त्या दुरुस्त कराव्यात आणि पीडित परिवाराला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे .
शेतात काम करतेवेळी दाम्पत्याचा विद्युत तारेला स्पर्श होऊन दुर्दैवी मृत्यू बेळगाव तालुक्यातल्या बिजगर्णी येथील घटना pic.twitter.com/acPgISZvHe
— Belgaumlive (@belgaumlive) August 6, 2023