बेळगाव लाईव्ह :शनिवारचा दिवस बेळगाव शहरासाठी एक दुःखद घटना घेऊन उजाडला होता. शाहूनगर अन्नपूर्णावाडी भागातील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून तीन जणांचा बळी गेला होता.
रामदुर्ग तालुक्यातून बेळगाव शहरात उदरनिर्वाहासाठी आलेल्या आजी आजोबा आणि नात अशा तिघांचा एकाच वेळी अंत झाला होता त्यामुळे या घटनेने संपूर्ण शहर हळहळले होते.
इमारतीत वाचमन काम करणाऱ्या आजी आजोबा सह आठ वर्षीय नातीचा देखील या घटनेतील मयतात समावेश होता.आजोबा इराप्पा राठोड वय 55 आजी शांतव्वा राठोड वय 50 आणि नात अन्नपूर्णा राठोड वय 8 मूळचे आरबेंची तांडा यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
शनिवारी बेळगाव ग्रामीणचे आमदार बेळगाव उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्या पीडित कुटुंबीयांची भेट भेट घेऊन सांत्वन केले होते. रविवारी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांनी शाहूनगर मधील त्या राठोड कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन तर केलेच याशिवाय जिल्हा प्रशासनाकडून त्यांना दोन लाख रुपये नुकसान भरपाई मदत देत असल्याचे सांगितले.
यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की सदर दुर्दैवी घटना घडली असून आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत जिल्हाधिकारी दोन लाख नुकसान भरपाई प्रत्येकी कुटुंबाच्या वारसाला देत आहेत तर मुख्यमंत्री साहाय्यता निधी मधून आणखी मदत देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.