विद्युत शॉर्टसर्किट झाल्याने बेळगाव शहरातील शाहूनगर अन्नपूर्णा वाडी आझम नगर भागात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे. मृत्यु झालेल्या आई वडील आणि मुलगीचा समावेश आहे ते लमानी समाजातील एकच कुटुंबातील आहेत .
घरामध्ये पाणी गरम करण्यासाठी कॉइल घातल्यावर शॉर्ट शॉर्ट सर्किट झाले पाणी गरम करायची कॉइल काढतेवेळी शॉक लागल्याने तीन जण मृत्यू झाल्याची घटना एपीएमसी पोलिसा स्थानकाच्या व्याप्तीमध्ये घडली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.
एका बांधकाम सुरू असलेल्या घरात हे कुटुंब वाचमन म्हणून काम करत होते सकाळी करंट असलेल्या वायर स्पर्श झाल्याने शॉक लागल्याची माहिती मिळाली आहे.
घरामध्ये पाणी गरम करण्यासाठी कॉइल काढते वेळी ही घटना घडली असून मृतकामध्ये मुलगी आणि आई वडिलांचा समावेश आहे. मृतांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत नेमकी घटना कशी घडली याची चौकशी पोलीस करत आहेत त्यानंतर नेमके कारण आणि मयतांची नावे समोर येणार आहेत.
एकूणच घरामध्ये असो किंवा बाहेर शॉक लागण्याच्या घटनात वाढ झाली असून नागरिकांनी पाणी गरम करतेवेळी कॉइल असो किंवा कोणतेही उपकरण वापरते वेळी सतर्कता बाळगून काळजीपूर्वक हाताळण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी शासकीय यंत्रणांनी देखील जनजागृती करणे गरजेचे आहे. रविवारी बिजगर्णी गावात शेतात काम करतेवेळी दाम्पत्याचा शॉक लागून मृत्यु झाला होता त्या घटनेनंतर सहा दिवसात ही दुसरी घटना बेळगावात घडली आहे.