बेळगाव लाईव्ह:बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावात भर दिवसा पुन्हा चोरीची घटना घडली आहे.गुरुवारी ही घटना उघडकीस आली आहे.
घरात कुणी नसलेले पाहून पाठीमागचा दरवाजा फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला असून गुंडू कोळी यांच्या घरातील तब्बल पाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण गुंडू कोळी यांच्या घराला कुलूप लाऊन सर्वजण शेताला गेले होते त्यामुळे घरात कुणी नसलेले पाहून चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
चोरट्यांनी त्यांच्या घरातील तीस हजार रुपये रोख रक्कम आणि सात तोळ्यांचे सोन्याचे दागिने आणि ऐवज पळवला आहे.बेळगाव ग्रामीण पोलिसांनी घटना स्थळी भेट देऊन पंचनामा केला.
गेल्या महिन्याभरापूर्वी गावचे ग्राम दैवत श्री महालक्ष्मी मंदिरात देखील चोरी झाली होती आणि दागिने लंपास करण्यात आले होते.ग्रामीण भागात वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण करण्याची गरज असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी यानिमित्ताने वर येऊ लागली आहे.